Share

रुपाली चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का? – सुषमा अंधारेंचा खोचक सवाल

Sushma Andhare Slams Rupali Chakankar: Is She Rashmika Mandanna or Smriti Irani?

Published On: 

Sushma Andhare hits back at Rupali Chakankar's publicity claims, questions her fame, asks if she's Rashmika Mandanna or Smriti Irani.

🕒 1 min read

पुणे | ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “चाकणकर रश्मिका मंदाना किंवा स्मृती इराणी आहेत का? त्यांच्यावर बोलल्याने आम्हाला प्रसिद्धी मिळेल, इतक्या त्या कोण आहेत?” असा सवाल करत त्यांनी खोचक टिप्पणी केली.

महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर चाकणकर यांनी असा आरोप केला होता की, “माझ्यावर आणि महिला आयोगावर टीका करून विरोधक प्रसिद्धी मिळवतात.”

Sushma Andhare Slams Rupali Chakankar

या विधानावर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “चाकणकर कोणत्या क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्ती आहेत? राजकारण, बॉलिवूड, की प्रशासन? काही लोकांना मोठे गैरसमज असतात. त्यांनी अंधश्रद्धेतून बाहेर यावं. सुनील तटकरेंनी लाडक्या बहिणीला समजावून सांगावं.” असेही सांगितले.

महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून अंधारे यांनी टीकास्त्र सोडलं. “पूर्णवेळ काम करणारी, कायद्याचं ज्ञान असलेली व्यक्ती आयोगाच्या अध्यक्षपदी हवी. सध्याच्या अध्यक्षांना कायद्यातलं काही समजत नाही. ईमेलला ‘स्यू मोटो’ म्हणतात. स्यू मोटो म्हणजे काय तेच माहीत नाही,” असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, चाकणकर म्हणाल्या होत्या की, “महाविकास आघाडीच्या काळातच मला महिला आयोगाचं अध्यक्षपद मिळालं आहे. त्यामुळे त्यांनी काय बोलायचं ते ठरवावं. आज टीका करणाऱ्या महिला निवडणुकीनंतर बाजूला पडल्या आहेत, त्यांना कोणी विचारत नाही. प्रसिद्धी मिळवी म्हणूनच त्या टीका करत आहेत.”

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही