🕒 1 min read
दररोज वाढणाऱ्या पेट्रोलच्या किमतींमुळे तुम्ही त्रस्त आहात? भविष्यात तुम्हाला पेट्रोल पंपावर जाण्याची गरजच पडणार नाही, असं कोणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? पण हे आता शक्य होणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील वाहन क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नागपूरमध्ये त्यांनी थेट १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या ‘E100’ इंधनाच्या (E100 Fuel) वापराला अधिकृत मंजुरी दिली आहे. यामुळे क्रूड ऑईलच्या आयातीचा ताण तर कमी होईलच, पण सर्वसामान्यांचा प्रवासही खूप स्वस्त होण्याची चिन्हे आहेत.
E100 Fuel In India
आता हे E100 नक्की आहे तरी काय? हे १०० टक्के शुद्ध इथेनॉल आहे, ज्यामध्ये पेट्रोलचा एक थेंबही नसतो. हे इंधन थेट ऊस, मका आणि तांदळासारख्या कृषी उत्पादनांपासून तयार केलं जातं. त्यामुळे क्रूड ऑईलवर खर्च होणारा पैसा आता थेट आपल्या बळीराजाच्या खिशात जाणार आहे.
आकडेवारीच बघायची झाली तर, देशाने इथेनॉलच्या वापरामुळे आतापर्यंत तब्बल १ लाख कोटी रुपयांची बचत केली आहे. तर दुसरीकडे, शेतकऱ्यांना ८० हजार कोटींचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले आहे. काही दिवसांपूर्वीच लाँच झालेले E85 इंधन पेट्रोलपेक्षा सुमारे २० रुपयांनी स्वस्त (८२.१२ रुपये प्रति लिटर) आहे, यावरून E100 च्या फायद्याचा अंदाज येतो.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दीड ते दोन महिन्यांत ह्युंदाई, टोयोटा आणि एमजी मोटर्ससारख्या बड्या कंपन्या त्यांच्या नव्या ‘फ्लेक्स फ्युएल’ कार्स बाजारात आणणार आहेत. मारुती सुझुकीने तर फ्लेक्स फ्युएलवर चालणाऱ्या वॅगनआर मॉडेलची घोषणाही केली आहे. सुरुवातीला या गाड्या टॅक्सी सेवांसाठी वापरल्या जातील.
दुसरीकडे, या नव्या तंत्रज्ञानासमोर काही आव्हानेही आहेत. हे E100 इंधन सध्याच्या जुन्या गाड्यांमध्ये अजिबात वापरता येणार नाही. यासाठी नव्या फ्लेक्स इंजिनच्या गाड्याच घ्याव्या लागतील, ज्यांची किंमत सुरुवातीला जास्त असू शकते.
सोबतच, देशभरात पेट्रोल पंपांवर E100 वितरणाची पूर्णपणे स्वतंत्र व्यवस्था उभी करावी लागणार आहे. त्यामुळे पेट्रोलची जागा एका रात्रीत घेतली जाणार नसली, तरी या दिशेने टाकलेलं हे पाऊल नक्कीच गेमचेंजर ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- विजय देवरकोंडा, रश्मिका मंदानाने जिंकली मनं; १८० विद्यार्थ्यांसाठी उचललेलं ‘हे’ पाऊल ठरतंय चर्चेचा विषय
- ‘छावा’मधील प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं संपवलं आयुष्य; संचिता उगलेचं टोकाचं पाऊल
- बार कौन्सिल निवडणुकीत तरुणाईचा विजय: Adv. ज्ञानेश्वर बागुल ठरले सर्वात तरुण सदस्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











