Share

मारुतीची मोठी खेळी: देशातील पहिली ८५% इथेनॉलवर चालणारी कार लाँच, पेट्रोलचे टेन्शन कायमचं संपणार?

मारुतीने ८५ टक्के इथेनॉलवर धावणारी देशातील पहिली वॅगन आर बायोफ्लेक्स कार लाँच केली असून, तिची सुरुवातीची किंमत ७.२४ लाख रुपये आहे.

Published On: 

Maruti WagonR BioFlex - India's first 85 percent ethanol flex fuel car

पेट्रोलचे दर शंभरीपार गेल्याने तुमच्या खिशाला मोठी कात्री लागतेय का? मग जरा विचार करा, जर तुम्हाला पेट्रोलपेक्षा चक्क २० रुपये स्वस्त इंधनावर चालणारी कार मिळाली तर? मारुती सुझुकीने (Maruti Suzuki WagonR) भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात अशीच एक मोठी खळबळ उडवून दिली आहे.

मारुतीने देशातील पहिली ‘फ्लेक्स-फ्युएल’ कार अधिकृतपणे लाँच केली आहे. ‘वॅगन आर बायोफ्लेक्स’ (WagonR BioFlex) असं या नव्या मॉडेलचं नाव असून ती E85 इंधनावर म्हणजेच ८५ टक्के इथेनॉल आणि १५ टक्के पेट्रोलच्या मिश्रणावर धावणार आहे. या कारची सुरुवातीची किंमत ७.२४ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

Maruti Suzuki WagonR BioFlex

सध्या ही कार केवळ व्यावसायिक वापरासाठी, म्हणजेच टॅक्सी आणि फ्लीट सर्व्हिससाठी उपलब्ध करण्यात आली आहे. स्टँडर्ड वॅगन आरच्या तुलनेत ही ई८५ आवृत्ती सुमारे ८६ हजार रुपयांनी महाग आहे. दिसायला ही कार रेग्युलर मॉडेलसारखीच असली तरी, तिला बाजारात एक वेगळी ओळख देण्यासाठी संपूर्ण बॉडीवर ‘फ्लेक्स फ्युएल’ ग्राफिक्स आणि बॅज देण्यात आला आहे.

ही कार ८५ टक्के इथेनॉलवर सुरळीत चालावी यासाठी इंजिनमध्ये बरेच तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. कंपनीने यात अपग्रेडेड फ्युएल इंजेक्टर, नवीन फ्युएल पंप आणि एक विशेष इथेनॉल सेन्सर बसवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सुधारित १.२ लिटर इंजिन नेहमीच्या पेट्रोल इंजिनपेक्षा किंचित जास्त पॉवर आणि टॉर्क जनरेट करतं.

कंपनीने या गाडीचं अधिकृत मायलेज अद्याप जाहीर केलेलं नाही. मॅन्युअल ट्रान्समिशन असलेली साधी वॅगन-आर २३.५६ किमी प्रति लिटर मायलेज देते. पण, इंधन चाचण्यांमधील प्राथमिक माहितीनुसार ई८५ इंधनामुळे मायलेजमध्ये सुमारे २४ टक्क्यांची घट होऊ शकते.

दुसरीकडे, दिल्लीत E85 इंधनाची विक्री अधिकृतपणे सुरू झाली असून, त्याची किंमत ८२.१२ रुपये प्रति लिटर निश्चित करण्यात आली आहे. हे ई८५ इंधन सध्याच्या रेग्युलर पेट्रोलपेक्षा तब्बल २० रुपयांनी स्वस्त आहे. त्यामुळेच, खर्चात होणारी मोठी बचत पाहता आगामी काळात या कारला व्यावसायिक सेगमेंटमधून मोठी मागणी येण्याची शक्यता आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही