सूर्यकुमार यादवची कॅप्टन्सी धोक्यात; BCCI कडून मोठा झटका? ‘हा’ स्टार खेळाडू होणार नवा बॉस!

खराब फॉर्म आणि मनगटाच्या दुखापतीमुळे सूर्यकुमार यादवकडून टी-२० कर्णधारपद काढून घेतले जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी श्रेयस अय्यर टीम इंडियाचा नवा कॅप्टन बनू शकतो.

Published On: 

Team India Captain: सूर्यकुमार यादवचा पत्ता कट? (Suryakumar Yadav)

क्रिकेटच्या मैदानात कधी कोणता डाव पलटेल, याचा नेम नसतो. आता पुन्हा एकदा असाच एक मोठा रणनितीक भूकंप भारतीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

टी-२० वर्ल्ड कप २०२६ (T20 World Cup) भारताला जिंकून दिला, तरीही टीम इंडियाचा (Team India) कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या चांगलाच अडचणीत सापडल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआय (BCCI) लवकरच संघात मोठी भाकरी फिरवण्याच्या तयारीत असून सूर्याकडून टी-२० ची कॅप्टन्सी हिरावून घेतली जाऊ शकते.

Team India Captain

जुलै २०२४ मध्ये कर्णधारपद हाती घेतल्यापासून सूर्याच्या फलंदाजीत मोठी घसरण झाली आहे. ४५ सामन्यांमधील त्याची आकडेवारी पाहिली तर जुना आक्रमक सूर्या कुठेच दिसत नाही. वर्ल्ड कपमध्येही अमेरिकेविरुद्धची खेळी सोडली तर महत्त्वाच्या मोठ्या मॅचेसमध्ये तो सपशेल फ्लॉप ठरल्याचं थिंक-टँकचं म्हणणं आहे.

या खराब फॉर्ममागे त्याची मनगटाची दुखापत हे एक मोठं कारण असल्याचं बोललं जात आहे. गेले काही महिने सूर्या उजव्या मनगटावर जाड टेपिंग लावून वेदनेतच खेळत आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळतानाही त्याला त्रास होत होता. टीम मॅनेजमेंटने याकडे सुरुवातीला सामान्य थकवा म्हणून पाहिलं, पण आता याचा थेट फटका त्याच्या फलंदाजीला बसतोय. वाढतं वय आणि फिटनेसच्या समस्यांमुळे त्याच्यावरील दडपण वाढलं आहे.

२०२८ ऑलिम्पिक आणि पुढचा टी-२० वर्ल्ड कप डोळ्यांसमोर ठेवून निवड समिती श्रेयस अय्यरच्या नावाचा गांभीर्याने विचार करत आहे. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील त्याचा दमदार रेकॉर्ड आणि शांत नेतृत्व यामुळे तो या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहे. सूर्याला पुढची दोन वर्षे कॅप्टन राहायचं असलं तरी, अंतिम निर्णय निवड समितीचाच असणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच मोठी खळबळ उडण्याची दाट शक्यता आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही