Share

गोविंदाच्या बायकोला दारूवरून डिवचलं; संतापलेल्या सुनिता आहुजाचा थेट बापावरून उद्धार!

दारू पिण्याच्या सवयीवरून विचारलेल्या प्रश्नावर गोविंदाची पत्नी सुनिता आहुजा चांगलीच संतापली. “मी कुणाच्या बापाच्या पैशांनी पीत नाही,” म्हणत तिने सडेतोड उत्तर दिलं आहे.

Published On: 

Sunita Ahuja Viral: दारूवरून गोविंदाची बायको भडकली!

बॉलिवूडमध्ये कोण कधी काय बोलेल आणि त्याचा बाऊ होईल, हे सांगता येत नाही. त्यात जर विषय थेट गोविंदाच्या कुटुंबाचा असेल, तर खळबळ उडणारच!

अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता आहुजा (Sunita Ahuja) तिच्या बेधडक आणि रोखठोक बोलण्यासाठी ओळखली जाते. नुकतीच ‘लाफ्टर शेफ्स ३’ मध्ये तिने आपल्या बिनधास्त अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. पण आता तिच्या एका पॉडकास्टमधील वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. मुद्दा आहे चक्क तिच्या ‘दारू’ पिण्याच्या सवयीचा!

Sunita Ahuja Viral

सध्या इंटरनेटवर ‘Sunita Ahuja On Drinking Alcohol’ हा विषय चांगलाच तापला आहे. २०२५ मध्ये अभिषेक व्यास यांच्या पॉडकास्टमध्ये तिला मद्यपानावरून एक डिवचणारा प्रश्न विचारण्यात आला होता. ‘तुम्ही पूजा-पाठही करता आणि दारूही पिता?’ असा थेट सवाल तिला करण्यात आला होता. यापूर्वी एका व्हायरल व्हिडिओत तिने घरातील आपली आवडती जागा ‘दारू पिण्याची’ असल्याचं बेधडकपणे कबूल केलं होतं.

या प्रश्नावर सुनिता आहुजाचा पारा चांगलाच चढला. तिने थेट प्रश्न विचारणाऱ्यांचा आणि ट्रोलर्सचा बापच काढला. “हो, मग काय झालं? मी कुणाच्या बापाच्या पैशांनी थोडीच दारू पिते. मी काही साधू-संत नाही की, कमंडल घेऊन बसू,” अशा कडक शब्दांत तिने उत्तर दिलं.

पुढे ती असंही म्हणाली की, आयुष्य बॅलन्स ठेवता आलं पाहिजे. नवरा, मुलं असा संसार असल्याने मी एक सामान्य माणूसच आहे. पूजा-अर्चा करते म्हणजे साध्वी झाले असा अर्थ होत नाही. “मला कोणी फुकट जेवायला घालत नाही किंवा दारू प्यायला पैसे देत नाही. डॉक्टरही सांगतात की, हृदयासाठी दोन पेग चांगले असतात,” असा मोठा गौप्यस्फोट करत तिने सर्वांची बोलती कायमची बंद केली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही