Share

सचिन तेंडुलकरचा ‘तो’ साथीदार आजाराने त्रस्त; CID फेम अभिनेत्याची अवस्था पाहून चाहतेही हळहळले!

सचिन तेंडुलकरसोबत डेब्यू करणारा माजी क्रिकेटपटू आणि ‘सीआयडी’ फेम सलिल अंकोला सध्या डिप्रेशनचा सामना करत आहेत. पुण्यातील एका आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Published On: 

Salil Ankola Health: सचिनचा साथीदार आजारी!

सचिन तेंडुलकरसोबत ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिलं पाऊल ठेवलं, तोच धडाकेबाज खेळाडू आज एका गंभीर आजाराशी एकाकी झुंज देतोय, हे ऐकून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल. होय, आपण बोलतोय माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सिलेक्टर सलिल अंकोला (Salil Ankola) यांच्याबद्दल. वयाच्या ५८ व्या वर्षी हा अष्टपैलू खेळाडू सध्या डिप्रेशनच्या गर्तेत अडकला असून, पुण्याच्या एका मानसिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

१९८९ साली कराची कसोटीत सचिनसोबतच सलिल अंकोला यांनीही डेब्यू केला होता. पण सध्या ते एका वेगळ्याच संकटाचा सामना करत आहेत. ऑक्टोबर २०२४ मध्ये आईच्या निधनानंतर सलिल यांना मोठा मानसिक धक्का बसला. या दुःखातून सावरणे त्यांना प्रचंड कठीण जात होते.

Salil Ankola Health

‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना त्यांची पत्नी रिया यांनी एक मोठा खुलासा केला आहे. “सलिलने स्वतःच वेळेत ब्रेक घेऊन स्वतःला सावरण्याचा निर्णय घेतला. तो एक फायटर आहे आणि आता वेगाने रिकव्हर होतोय,” असं रिया यांनी स्पष्ट केलं.

विशेष म्हणजे, जवळपास दोन दशकांपूर्वी सलिल हे मद्याच्या आहारी गेले होते. पण रिया यांनी ठामपणे सांगितलंय की, आताच्या मानसिक स्थितीचा आणि दारूचा काडीमात्र संबंध नाही. त्यांनी खूप आधीच दारू सोडली आहे. हे Salil Ankola Health Update ऐकून अनेक चाहत्यांना थोडा दिलासा मिळालाय.

क्रिकेटच्या मैदानावर ५४ फर्स्ट क्लास सामन्यांत १८१ विकेट्स घेणारा हा वेगवान गोलंदाज नंतर मनोरंजन विश्वाकडे वळला. प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘CID’ मध्येही त्यांनी दमदार भूमिका साकारली होती. जानेवारी २०२३ ते ऑगस्ट २०२४ या काळात ते भारतीय टीमचे नॅशनल सिलेक्टर म्हणून कार्यरत होते. आता हा ‘फायटर’ पुन्हा एकदा डिप्रेशनवर मात करून खंबीरपणे उभा राहील, अशीच तमाम क्रिकेटप्रेमींची भावना आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही