Share

विद्या बालनची ‘हास्यजत्रे’तील ओंकार भोजनेच्या स्कीटवर रील! व्हिडिओवर स्टार्सच्या भन्नाट कमेंट्स

विद्या बालनने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार भोजनेच्या ‘काय लागतं जगण्यासाठी’ या प्रसिद्ध डायलॉगवर रील बनवला असून, सोशल मीडियावर या व्हिडिओची तुफान चर्चा आहे.

Published On: 

Vidya Balan Onkar Bhojne funny Instagram reel video

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा फक्त मराठी प्रेक्षकांचाच नव्हे, तर चक्क बॉलिवूड सेलिब्रिटींचाही आवडता शो आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? होय, हे अगदी खरंय.

नेहमीच आपल्या दमदार अभिनयाने बॉक्स ऑफिसवर राज्य करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनला (Vidya Balan) आता हास्यजत्रेच्या कॉमेडीची भुरळ पडली आहे.

Vidya Balan Onkar Bhojne

तिने चक्क अभिनेता ओंकार भोजनेच्या (Onkar Bhojne) एका भन्नाट डायलॉगवर इन्स्टाग्राम रील बनवला असून, सध्या सोशल मीडियावर याच व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली आहे.

‘एवढेच हवे आहे जगण्यासाठी.. हा हा हा हा’ असं मजेशीर कॅप्शन देत विद्याने हा व्हिडिओ पोस्ट केलाय. ओंकार भोजनेच्या ‘अगं अगं आई’ या प्रहसनामधील तो अत्यंत गाजलेला डायलॉग आहे. “काय लागतं जगण्यासाठी? अन्न, वस्त्र, निवारा बस्स.. टीव्ही लागतो. बस्स.. इकडे तिकडे फिरायला बाईक लागते. बाईकमध्ये टाकायला पेट्रोल लागतं… बापरे! लई काय काय लागतंय!” असा हा प्रसिद्ध डायलॉग विद्याने हुबेहूब लिप्सिंक करत चाहत्यांना खळखळून हसवलं आहे.

दुसरीकडे, विद्याच्या या व्हिडिओवर ‘हास्यजत्रे’तील कलाकारांनीही कौतुकाचा वर्षाव केलाय. अभिनेत्री नम्रता संभेरावने ‘Wohoo’ म्हणत हसण्याचे इमोजी शेअर केलेत.

तर अभिनेत्री सई ताम्हणकरनेही ‘Yayyy mam’ अशी खास कमेंट करत आपला आनंद व्यक्त केलाय. प्रियदर्शनी इंदलकरनेही या रीलला पसंती दर्शवली आहे.

विद्या बालन मनोरंजनसृष्टीतील अतिशय तगडी कलाकार म्हणून ओळखली जाते. गंभीर भूमिकांइतकाच तिला कॉमेडीचाही शौक आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नकला करतानाचे अनेक व्हिडिओज पाहायला मिळतात.

याआधीही तिने भाऊ कदम यांच्या ऑडिओवर रील्स बनवले होते. आता ओंकारच्या डायलॉगवरील तिच्या या नव्या रीलने चाहत्यांसह मराठी सेलिब्रिटींचीही मनं जिंकली आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही