Share

६ बंडखोर खासदारांचं भवितव्य ठरणार? ओम बिर्ला ऐकणार ठाकरेंची बाजू

शिवसेना ठाकरे गटाच्या ६ बंडखोर खासदारांच्या मान्यतेवरून वाद सुरू असून, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आज ठाकरे गटाची बाजू ऐकणार आहेत.

Published On: 

६ बंडखोर खासदारांचं भवितव्य ठरणार? ओम बिर्ला ऐकणार ठाकरेंची बाजू

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा बंडखोर खासदारांच्या राजकीय भवितव्याबाबत आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांच्यासमोर सुनावणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. चार दिवस संपर्काबाहेर राहिल्यानंतर या सहा खासदारांनी समोर येत आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर आता ठाकरे गटालाही (Thackeray Gat) आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) आणि अनिल देसाई (Anil Desai) यांना भेटीसाठी बोलावले आहे. ही भेट आज संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. यावेळी बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाला मान्यता देऊ नये, अशी मागणी ठाकरे गटाकडून केली जाण्याची शक्यता आहे.

यापूर्वी अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र देऊन पक्षांतरबंदी कायद्याचा दाखला देत सहा खासदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली होती. पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन केल्याचा आरोपही ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, लोकसभा अध्यक्षांसमोर हजेरी लावताना सहा बंडखोर खासदारांना त्यांच्या निर्णयाबाबत आणि कोणत्याही दबावाखाली हा निर्णय घेतला आहे का, याबाबत विचारणा करण्यात आली होती. या भेटीचा व्हिडिओ लोकसभा सचिवालयाकडे उपलब्ध असल्याची माहिती आहे.

ठाकरे गटाने यापूर्वीच बंडखोर खासदारांना पक्षातून निलंबित केले आहे. पक्षाच्या बैठकीसाठी काढण्यात आलेला व्हीप न पाळल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा निर्णय या संपूर्ण प्रकरणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही