Share

राज ठाकरेंचा नार्वेकरांवर टीकास्त्र; माफी मागत दिलं स्पष्टीकरण

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठी वाचनातील चुकांवरून झालेल्या वादानंतर सभागृहात माफी मागितली.

Published On: 

Rahul Narwekar

मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी स्वर्गीय आशाताई भोसले (Ashatai Bhosle) यांच्या शोक प्रस्तावाचे वाचन केले. वाचन करताना झालेल्या मराठी उच्चारांच्या चुकांवरून विधानसभेत मोठा वाद निर्माण झाला. या वादावर नार्वेकर यांनी आज सभागृहात स्पष्टीकरण देत माफी मागितली. “वाचन करताना माझ्याकडून चूक घडली, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे नार्वेकर यांनी सांगितले.

राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या हातात आलेली भाषणाची प्रत अतिशय बारीक फॉन्टमध्ये होती. त्यामुळे वाचन करताना काही चुका झाल्या. “गेल्या चार वर्षांपासून मी अध्यक्ष म्हणून काम करत आहे, अनेक भाषणे आणि प्रस्ताव मी मराठीतून मांडले आहेत. मराठी भाषेबद्दल मलादेखील तितकाच अभिमान आहे.” असे त्यांनी म्हटले.

पद्मविभूषण पुरस्कार विजेती आशाताई भोसले यांच्याबद्दल अनादर करण्याचा कोणताही हेतू नाही. घडलेली घटना ही केवळ वाचनातील चुकीमुळे झाली. या घटनेमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो,” असे नार्वेकर यांनी सभागृहात सांगितले.

दरम्यान, या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला. विधानसभेतील शोक प्रस्ताव वाचनावेळी मराठी भाषेचा अपमान झाल्याचा आरोप करत त्यांनी सभागृहातील सदस्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले.

राज ठाकरे यांनी म्हटले की, शोक प्रस्तावासारख्या गंभीर प्रसंगी झालेल्या चुका या चिंताजनक आहेत. दीनानाथ मंगेशकर यांचा उल्लेख करताना नार्वेकर यांनी ते ‘दीनदयाल मंगेशकर’ असे म्हटले. तसेच राज ठाकरे यांनी सभागृहातील जागरुकतेवरही टीका केली.

या घटनेनंतर काही सदस्यांनी भाषण तयार करणाऱ्या आणि प्रिंट देणाऱ्या संबंधित व्यक्तींवरही जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. केवळ अध्यक्षांवर दोष न देता संपूर्ण प्रक्रियेची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

मराठी भाषेच्या अस्मितेशी जोडल्या गेलेल्या या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राहुल नार्वेकरांच्या माफीनंतरही विरोधकांकडून टीका सुरू आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही