🕒 1 min read
मुंबईसारख्या शहरात स्वतःचं घर आणि दारात एक चकचकीत गाडी असावी, असं स्वप्न कोण पाहत नाही? सामान्य माणसापासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाची हीच धडपड असते. याच धडपडीला आता मराठमोळ्या अंशुमन विचारेच्या (Anshuman Vichare) आयुष्यात मोठं यश आलं आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अंशुमन विचारेनं नुकतंच आपलं हे स्वप्न पूर्ण केलंय. गुढीपाडव्याला मुंबईत आपलं तिसरं घर घेतल्याची आनंदाची बातमी त्याने दिली होती. आता या पाठोपाठ अभिनेत्यानं चाहत्यांना आणखी एक सुखद धक्का दिला आहे.
Anshuman Vichare Car
अंशुमनने आता एक भन्नाट ई-कार खरेदी केली आहे. त्याने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास व्हिडीओ शेअर करत या नव्या कारची पहिली झलक दाखवली. अंशुमननं चक्क ३० लाख रुपये किंमतीची नवीकोरी Mahindra XEV 9e गाडी आपल्या दारात आणली आहे.
‘New addition in the family…’ असं कॅप्शन देत त्याने हा आनंद व्यक्त केलाय. त्याची पत्नी पल्लवी विचारे हिनेदेखील नव्या घरात शिफ्ट झाल्यानंतरचा हा नवा प्रवास चाहत्यांसोबत शेअर केलाय. सध्या इंटरनेटवर Anshuman Vichare New Car चा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ असा अंशुमनचा प्रवास अतिशय खडतर पण यशस्वी राहिला आहे. त्याच्या या नव्या घवघवीत यशावर आता मनोरंजन विश्वातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. अनेक नामवंत कलाकारांनी त्याच्या पोस्टवर कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अंशुमन आता लवकरच ‘तुंबाडची मंजुळा’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे यंदाचं वर्ष त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने लकी ठरत आहे, असं म्हणायला हरकत नाही.
📌 महत्वाच्या बातम्या
- मलायका अरोरा पुन्हा बोहल्यावर? 19 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडसोबत थेट आईच्या घरी; चर्चांना उधाण
- हेमंत ढोमेचा ‘कॉकरोच जनता पार्टी’ला जाहीर पाठिंबा; ‘त्या’ सडेतोड पोस्टने राजकीय वर्तुळात उडवली खळबळ!
- करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाशच्या गुपचूप लग्नाची चर्चा; आता प्रपोजलचा ‘तो’ व्हिडिओ आला समोर अन् चाहत्यांना सुखद धक्का!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












