Share

मलायका अरोरा पुन्हा बोहल्यावर? 19 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडसोबत थेट आईच्या घरी; चर्चांना उधाण

अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर आता मलायका अरोरा हिरे व्यापारी हर्ष मेहताला डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघांनी आईची भेट घेतल्याने लग्नाच्या चर्चा रंगल्यात.

Published On: 

Malaika Arora Harsh Mehta: मलायका पुन्हा बोहल्यावर?

🕒 1 min read

बॉलिवूडमध्ये कधी कोणाचं कोणाशी सूत जुळेल आणि कधी ब्रेकअप होईल, हे सांगता येत नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. अभिनेता अर्जुन कपूरशी ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आता पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची जोरदार चर्चा आहे.

तिच्या या नव्या नात्याची सध्या बी-टाऊनमध्ये खळबळ उडाली आहे. बुधवारी, २० मे च्या रात्री मलायका मुंबईत तिच्या आईच्या घरी पोहोचली. यावेळी ती सलवार सूटमध्ये कॅमेऱ्यांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत होती. ती एकटी असती तर कुणाला फारसं आश्चर्य वाटलं नसतं.

Malaika Arora Harsh Mehta

पण तिच्या मागोमाग एक खास व्यक्तीही तिच्या आईच्या घरी पोहोचली आणि थेट लग्नाच्याच चर्चांना उधाण आलं. ही व्यक्ती दुसरी कुणी नसून तिचा नवा रुमर्ड बॉयफ्रेंड हर्ष मेहता (Harsh Mehta) आहे.

हर्ष हा प्रसिद्ध हिरे व्यापारी असून तो मलायकापेक्षा तब्बल १९ वर्षांनी लहान आहे. सध्या मलायका ५२ वर्षांची आहे, तर हर्ष अवघा ३३ वर्षांचा आहे. हर्ष सैंकस मॅनेजमेंट कंपनीचा तो मॅनेजिंग डायरेक्टर असून त्याच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचं बोललं जातं.

सूत्रांनुसार, हे दोघं गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी राजस्थानमधील एका प्रसिद्ध मंदिरालाही एकत्र भेट दिली होती. अरबाज खान आणि त्यानंतर अर्जुन कपूरसोबतचं नातं संपुष्टात आल्यानंतर आता हर्षची मलायकाच्या आयुष्यात एन्ट्री झालीये.

आता थेट आईच्या घरी दोघांनी एकत्र हजेरी लावल्याने, हे नातं लग्नापर्यंत पोहोचणार का? लग्नाची बोलणी पक्की झालीये का? असे प्रश्न नेटकरी हा व्हिडीओ पाहून विचारत आहेत. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी नसली तरी, या नव्या जोडीमुळे सोशल मीडियावर मात्र चांगलाच धुरळा उडालाय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही