Share

करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाशच्या गुपचूप लग्नाची चर्चा; आता प्रपोजलचा ‘तो’ व्हिडिओ आला समोर अन् चाहत्यांना सुखद धक्का!

करण कुंद्राने तेजस्वी प्रकाशला ‘देसी ब्लिंग’ शोमध्ये रोमँटिक प्रपोज केलं आहे. त्यांचा हा भावूक करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Published On: 

Karan Kundrra Tejasswi Proposal: अखेर लग्नाची गुडन्यूज!

🕒 1 min read

मनोरंजन विश्वात कधी कोणत्या जोडीची चर्चा रंगेल हे सांगता येत नाही, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. गेल्या काही दिवसांपासून टीव्ही जगतातील सर्वात लोकप्रिय जोडी, करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) यांच्या गुपचूप कोर्ट मॅरेजची जोरदार चर्चा सुरू होती.

अभिनेता अभिषेक कुमारने केलेल्या एका विधानामुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली होती. मात्र, आता या चर्चांवर पडदा पडला असून चाहत्यांसाठी एक अत्यंत सुखद बातमी समोर आली आहे.

Karan Kundrra Tejasswi Proposal

नेटफ्लिक्सवर नुकत्याच २० मे रोजी स्ट्रीम झालेल्या ‘देसी ब्लिंग’ या नव्या शोमधील एक व्हिडिओ सध्या वाऱ्यासारखा व्हायरल होतोय. सूत्रांनुसार, दुबईमध्ये शूट झालेल्या या शोमध्ये करणने अतिशय शाही आणि रोमँटिक अंदाजात तेजस्वीला प्रपोज केलं आहे. हातात एक मोठी डायमंड रिंग घेऊन करण थेट गुडघ्यावर बसला. त्याने अस्सल पंजाबी स्टाईलमध्ये तेजस्वीला लग्नासाठी मागणी घातली.

करणने “Will You Marry Me?” असा प्रश्न विचारताच तेजस्वीला आश्चर्याचा धक्का बसला आणि तिचे डोळे पाणावले. यावेळी भावूक होत ती म्हणाली, “बिग बॉसमधून बाहेर आल्यावर अनेकांनी आपल्याला आणि आपल्या नात्याला फेक ठरवलं होतं. हे नातं दोन आठवडेही टिकणार नाही असे टोमणे मारले गेले. पण आज आपण चार वर्षं अभिमानाने एकत्र आहोत.”

तेजस्वीच्या या भावनांवर करणनेही अगदी मनापासून उत्तर दिलं. तो म्हणाला, “तू मला एक चांगला माणूस बनवलंस. तुझ्यासोबत प्रेमाचा अर्थ नव्याने समजला.” Karan Kundrra Proposal चा हा व्हिडिओ पाहून चाहते आता त्यांच्या खऱ्याखुऱ्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अद्याप या दोघांनी लग्नाच्या तारखेबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही, पण या प्रपोजलने मात्र सर्वांचीच मनं जिंकली आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही