Share

ऋषभ पंतचे उपकर्णधारपद शुबमन गिलमुळे गेले? बहिणीच्या ‘त्या’ एका लाईकने क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ!

शुबमन गिलच्या दबावामुळे ऋषभ पंतचे उपकर्णधारपद गेल्याचा दावा करणाऱ्या व्हिडिओला पंतच्या बहिणीने लाईक केले आहे. यामुळे क्रिकेट विश्वात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

Published On: 

Rishabh Pant News: गिलमुळे पंतचं पद गेलं?

🕒 1 min read

क्रिकेटच्या मैदानात आणि बाहेर राजकारण कधी तापेल सांगता येत नाही, याचाच प्रत्यय आता पुन्हा एकदा आलाय. आयपीएल २०२६ (IPL 2026) मध्ये लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार Rishabh Pant सध्या भलत्याच चक्रव्यूहात अडकला आहे.

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात २२० धावांचा डोंगर उभारूनही लखनौला पराभवाचा सामना करावा लागला. सलग पराभवांमुळे पंत आधीच संतापात असताना, आता बीसीसीआयने त्याला आणखी एक मोठा झटका दिलाय.

Rishabh Pant News

अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली असून पंतला वनडे संघातून डच्चू मिळाला आहे. सर्वात मोठा धक्का म्हणजे, वर्षभरापूर्वी दिलेले त्याचे कसोटी उपकर्णधारपदही काढून आता केएल राहुलकडे सोपवण्यात आले आहे. पण या सगळ्या नाट्यात खरी खळबळ उडाली ती सोशल मीडियावरील एका खळबळजनक दाव्यामुळे.

पंतला उपकर्णधारपदावरून हटवण्यामागे चक्क शुबमन गिलचा (Shubman Gill) हात असल्याचा मोठा दावा एका इन्स्टाग्राम व्हिडिओत करण्यात आला आहे. सोशल मीडियावर रोज अनेक अफवा पसरतात, त्यामुळे अशा दाव्यांना सहसा महत्त्व दिले जात नाही.

मात्र, या व्हिडिओला चक्क पंतची बहीण साक्षीने लाईक केल्याने या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या दाव्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी नाही, पण साक्षीच्या या कृतीने भारतीय ड्रेसिंग रूममध्ये काहीतरी शिजतंय का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पंतची कामगिरी अतिशय सुमार होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या मालिकेत त्याने दोन सामन्यांत केवळ १२.२ च्या सरासरीने ४९ धावा केल्या होत्या. याच अपयशामुळे त्याचे पद गेल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पण आता बहिणीच्या ‘त्या’ एका कृतीने या वादात आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!