Share

थलापती विजयच्या कोस्टाराने स्वीकारला इस्लाम! ‘त्या’ एका प्रसंगामुळे बदलला धर्म, आता नावही बदलणार…

थलापती विजयच्या ‘भगवती’ सिनेमातील सहकलाकार जय संपत याने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. २०११ पासून तो मुस्लिम रितीरिवाजांचे पालन करत असून लवकरच नाव बदलणार आहे.

Published On: 

Thalapathy Vijay Co-Star: अभिनेत्याने स्वीकारला इस्लाम!

🕒 1 min read

सिनेसृष्टीत कधी कुणाचं आयुष्य कोणत्या वळणावर जाईल आणि कोण काय निर्णय घेईल, हे कोणीच सांगू शकत नाही. याचाच एक मोठा प्रत्यय आता पुन्हा एकदा समोर आलाय. एकीकडे तमिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि सुपरस्टार थलापती विजय (Thalapathy Vijay) आपली राजकीय इनिंग गाजवत आहेत.

पण आता त्यांच्यासोबत कधीकाळी रुपेरी पडदा गाजवणाऱ्या एका प्रसिद्ध अभिनेत्याने चक्क इस्लाम धर्म स्वीकारल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. एवढंच नाही, तर तो आता स्वतःचं नावही बदलणार आहे. या बातमीने मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे.

Thalapathy Vijay Co-Star

हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून ‘भगवती’ (Bhagavathi) चित्रपटात विजयच्या भावाची भूमिका साकारणारा ‘जय’ ऊर्फ जय संपत (Jai Sampath) आहे. जयने हा धक्कादायक खुलासा केलाय.

विशेष म्हणजे, काल-परवा नव्हे तर गेल्या २०११ सालापासूनच तो मुस्लिम धर्माच्या चालीरीती आणि प्रार्थनांचे पालन करत आहे. लवकरच अधिकृतपणे नाव बदलून तो नव्या प्रवासाला सुरुवात करणार असल्याचंही त्याने स्पष्ट केलं.

यामागचं कारण सांगताना जय म्हणाला, “मी एकदा एका मशिदीत गेलो होतो. मी एक मोठा अभिनेता आहे हे तिथे सगळ्यांना माहीत होतं. पण मशिदीत माझ्याशी कोणीही बोललं नाही किंवा माझ्यासोबत फोटो काढला नाही. आतमध्ये सगळे जण केवळ अल्लाहला सर्वोच्च मानतात, तिथे कुणीही व्हीआयपी नसतं.”

मशिदीतून बाहेर आल्यावर मात्र सर्वांनी नेहमीप्रमाणे त्याच्याशी गप्पा मारल्या. पण आतमधील त्या शांततेने आणि समानतेच्या भावनेने जयचा स्वभाव कायमचा बदलला. एक अभिनेता म्हणून मिळणाऱ्या व्हीआयपी वागणुकीपेक्षा, त्याला ती समानता अधिक भावली आणि त्याने हा मोठा निर्णय घेतला. सध्या सोशल मीडियावर जय संपत याच्या या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही