Share

जितेंद्र आव्हाड यांनी थेट आकाडाच सांगितला; पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी भडकणार!

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता असून, जितेंद्र आव्हाड यांनी थेट २० रुपये प्रति लिटर दरवाढीचा मोठा दावा केला आहे.

Published On: 

Petrol Diesel Price: इंधन दरवाढीचा भडका!

खिशात पैसे असले तरी पेट्रोल (Petrol Diesel Price) पंपावर गाडीत तेल मिळेलच याची शाश्वती आता राहिलेली नाही. त्यातच महागाईने आधीच होरपळलेल्या सर्वसामान्यांसाठी आता आणखी एक धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे.

गेल्या एका आठवड्यातच देशभरात इंधनाचे दर तब्बल ४ रुपयांनी वाढले आहेत. १५ मे रोजी ३ रुपये आणि १९ मे रोजी ९० पैशांनी झालेली ही दरवाढ केवळ एक ट्रेलर असल्याचा दावा आता विरोधकांनी केलाय.

Petrol Diesel Price

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर एक मोठा गौप्यस्फोट करत राजकारणात आणि सर्वसामान्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, ही दरवाढ इथेच थांबणार नसून येत्या काळात पेट्रोल आणि डिझेल थेट २० रुपये प्रति लिटरने महागणार आहे.

ही इतकी मोठी दरवाढ का होऊ शकते? यामागे जागतिक बाजारातील घडामोडी आणि गणिते कारणीभूत आहेत. ‘कोटक इन्स्टिट्युशनल इक्विटीज’च्या अहवालानुसार, कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या किंमतींमुळे सरकारी तेल कंपन्यांना तब्बल २५,००० कोटी रुपयांचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.

गेल्या चार वर्षांत किरकोळ दरवाढ वगळता मोठा बदल झाला नव्हता. पण आता हे प्रचंड नुकसान भरून काढण्यासाठी कंपन्यांना प्रति लिटर १३ ते १७ रुपयांची दरवाढ करणे भाग असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या Petrol Diesel Price वाढल्याने आणि अनेक शहरांमध्ये इंधन पुरवठा विस्कळीत झाल्याने पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

तासनतास रांगेत उभं राहूनही इंधन मिळत नसल्याने नागरिकांचा संयम सुटत आहे. काही ठिकाणी तर अक्षरशः हाणामारीच्या घटनाही समोर आल्या आहेत. जर सरकारने तातडीने हस्तक्षेप केला नाही, तर देशभरात मोठी अनागोंदी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता या संकटातून सरकार मार्ग कसा काढणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही