Share

अंबानींच्या ‘वंतारा’चे महागडे आईस्क्रीम; एका चमच्याची किंमत ऐकून डोळे पांढरे होतील!

मुकेश अंबानी यांच्या ‘वंतारा’ प्रोजेक्टने मुंबईत ‘वंतारा क्रीमरी’ हा लक्झरी ब्रँड लाँच केला असून, याच्या एका आईस्क्रीम स्कूपची किंमत ७५० ते १००० रुपये आहे.

Published On: 

Vantara Creamery: अंबानींचे महागडे आईस्क्रीम!

एका आईस्क्रीमच्या स्कूपसाठी तुम्ही जास्तीत जास्त किती पैसे द्याल? ५०, १०० की फार तर २०० रुपये? पण जर एक चमचा आईस्क्रीमची किंमत थेट हजाराच्या घरात असेल तर? ऐकूनच चक्रावलात ना, पण हे पूर्णपणे खरं आहे.

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (ambani) यांच्या कुटुंबीयांच्या प्रत्येक हालचालीकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते. आता वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या त्यांच्या ‘वंतारा’ (Vantara Creamery) या ड्रीम प्रोजेक्टने थेट फूड मार्केटमध्ये उतरून सर्वांना मोठा धक्का दिला आहे.

Vantara Creamery

मुंबईच्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह येथे ‘Vantara Creamery’ या अत्यंत महागड्या लक्झरी आईस्क्रीम ब्रँडचे लाँचिंग करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या आईस्क्रीमच्या एका स्कूपची किंमत तब्बल ७५० रुपयांपासून सुरू होऊन १००० रुपयांपर्यंत जाते. ही किंमत ऐकूनच सामान्य माणसाच्या तोंडचे पाणी पळेल.

प्राण्यांचे वेल्फेअर सेंटर की कमर्शियल डेअरी? असा प्रश्न आता या निमित्ताने सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. मात्र, कंपनीचा दावा अतिशय वेगळा आहे. जामनगरच्या फॅसिलिटीमध्ये रेस्क्यू केलेल्या आणि नैसर्गिक गवत चरणाऱ्या गीर गायींच्या १०० टक्के शुद्ध ऑर्गेनिक A2 दुधापासून हे आईस्क्रीम तयार केले जाते. यामध्ये कोणतीही मिल्क पावडर, कृत्रिम फ्लेव्हर किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरले जात नाहीत.

या ब्रँडच्या मेन्यूमध्ये मलाई कुल्फी, फिल्टर कॉफी आणि केसर पेढ्यासारखे १७ पारंपरिक भारतीय पदार्थ आहेत. पण मार्केट एक्सपर्ट्सच्या मते, ७५० रुपये किंमत ही केवळ सामुग्रीची नसून ‘अंबानी’ ब्रँड नेम आणि एक्सक्लूसिविटीची आहे.

कारण बाजारात आधीपासूनच Iceberg Organic Ice Cream सारखे ब्रँड अवघ्या १३० ते १५० रुपयात शुद्ध A2 दुधाचे आईस्क्रीम देत आहेत. तर Highland Farms ची कुल्फी ३८० रुपयांना मिळते. त्यामुळे अंबानींचा हा नवा ब्रँड केवळ श्रीमंतांचे ‘स्टेटस सिंबल’ बनणार की काय, अशी चर्चा आता रंगली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install