Share

प्राजक्ताचं नऊवारी साडीत खुललं सौंदर्य; म्हणतेय, ‘काही लिहायची गरज?’

कान्स चित्रपट महोत्सवात अभिनेत्री प्राजक्ता माळीने मोरपिसी नऊवारी साडीत लक्षवेधी फोटोशूट केले आहे. तिच्या या मराठमोळ्या लूकची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.

Published On: 

Prajakta Mali Cannes Look: नऊवारीने वेधलं लक्ष!

कान्स चित्रपट महोत्सवात (Cannes Film Festival) नेहमीच हॉलिवूड आणि बॉलिवूड तारकांच्या फॅशनची चर्चा रंगते. पण सातासमुद्रापार थेट फ्रान्सच्या किनाऱ्यावर मराठमोळ्या नऊवारीने सर्वांना भुरळ घातली तर? होय, याचाच अभिमानास्पद प्रत्यय नुकताच आलाय.

फ्रान्समध्ये सुरू असलेल्या या जगातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित महोत्सवात यंदा मराठी कलाकारांनी दमदार एन्ट्री घेतली आहे. पण यात सध्या संपूर्ण इंटरनेटवर एकच नाव धुमाकूळ घालतंय, ते म्हणजे महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali)!

Prajakta Mali Cannes Look

प्राजक्ताने नुकतेच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर कान्सच्या समुद्रकिनाऱ्यावरील काही भन्नाट फोटो शेअर केले आहेत. मोरपिसी रंगाची अस्सल नऊवारी साडी, नाकात नथ, कपाळावर ठसठशीत चंद्रकोर आणि कमरेला कमरपट्टा असा तिचा हा मराठमोळा साज पाहून परदेशी पाहुणेही अवाक झाले आहेत.

या ग्लॅमरस फोटोंना कॅप्शन देताना प्राजक्ताने आपला स्वॅग दाखवत लिहिलंय की, “काही लिहायची गरज? फक्त मिळत असलेल्या सगळ्या प्रेमाबद्दल..खूप प्रेम.” तिचा हा नखरेल आणि रुबाबदार अंदाज पाहून नेटकरीही अक्षरशः वेडे झाले आहेत.

तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कौतुकाचा नुसता पाऊस पडत आहे. एका युजरने तिला थेट ‘महाराष्ट्राची अप्सरा’ म्हटलंय, तर दुसऱ्याने ‘जणू काही इंद्राघरची अप्सरा उभी सागराकाठी’ अशी भन्नाट कमेंट करत दाद दिली आहे.

वेस्टर्न आऊटफिट्सच्या भाऊगर्दीत प्राजक्ताच्या या नऊवारीने सातासमुद्रापार मराठी संस्कृतीचा झेंडा खऱ्या अर्थाने रोवला आहे, अशीच चर्चा आता सगळीकडे रंगली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही