Share

गोविंदाचा तुटलेला दात अन् व्हायरल व्हिडीओ; चाहत्यांचा धक्कादायक संशय, म्हणाले “बायकोनेच…”

बॉलिवूडचा ‘हिरो नंबर वन’ गोविंदाचा तुटलेल्या दाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्याच्या या अवस्थेवर चाहत्यांनी मिश्कील आणि धक्कादायक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Published On: 

Govinda Viral Video: गोविंदाचा दात तुटला, चाहते थक्क!

बॉलिवूडचा ‘हिरो नंबर वन’ अचानक अशा अवस्थेत दिसेल, याचा कुणी स्वप्नातही विचार केला नसेल! 90 च्या दशकात आपल्या भन्नाट डान्स आणि जबरदस्त कॉमिक टायमिंगने सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या एका सुपरस्टारची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून सर्वांचा लाडका गोविंदा (Govinda) आहे.

नुकतंच मुंबईतल्या एका कार्यक्रमात गोविंदा स्पॉट झाला. त्याला पाहण्यासाठी नेहमीप्रमाणेच चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. पण यावेळी कॅमेऱ्यात जे कैद झालं, त्याने इंटरनेटवर एकच खळबळ उडवून दिली.

Govinda Viral Video

हसतमुख गोविंदा चाहत्यांना भेटत असताना त्याचा पुढचा एक दात तुटलेला स्पष्टपणे दिसला. या ताज्या Govinda Broken Tooth Video ने चाहत्यांना मात्र मोठा धक्का दिलाय. त्याची ही अवस्था पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं आहे.

या व्हिडीओवर आता कमेंट्सचा पाऊस पडत आहे. वयाच्या सत्तरीकडे झुकताना शरीरात होणारे बदल नैसर्गिक आहेत, हे काहींनी समजावून सांगितलं. मात्र, काही नेटकऱ्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या भन्नाट कमेंट्सने लक्ष वेधून घेतलंय. एका युझरने तर चक्क, “बहुतेक बायकोनंच मारलं असावं…” अशी मिश्कील कमेंट करून चर्चेला वेगळीच फोडणी दिली.

दात तुटलेला असो वा म्हातारपण आलेलं असो, गोविंदाची क्रेझ आजही कमी झालेली नाही. “काहीही झालं तरी तुम्ही आमचे सुपरस्टार आहात,” अशा भावना व्यक्त करत चाहत्यांनी त्याला भरभरून प्रेम दिलंय. एका चाहत्याने दिलेल्या “दातावर नाही, त्याच्या स्मितहास्यावर लक्ष द्या” या सल्ल्याने तर अनेकांची मनं जिंकली आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install