Share

कान्समध्ये असेल प्राजक्ता माळीचा जलवा; पण इकडे तर हवा मात्र गिरीजा ओकचीच

कान्स महोत्सवात प्राजक्ता माळीची चर्चा असली तरी, अभिनेत्री गिरीजा ओकच्या नव्या आयव्हरी साडीतील फोटोंनी सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Published On: 

Girija Oak Photoshoot: कान्समध्ये प्राजक्ता, पण हवा गिरीजाचीच!

🕒 1 min read

सोशल मीडियावर कधी कुणाची हवा होईल सांगता येत नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. सध्या संपूर्ण जगाचं लक्ष फ्रान्समधील ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’कडे लागलं आहे. यंदाच्या या महोत्सवात प्राजक्ता माळी, अंकिता वालावलकर, अशोक सराफ आणि निवेदिता सराफ अशा अनेक मराठी तारकांनी हजेरी लावून लक्ष वेधून घेतलं.

पण, कान्समध्ये प्राजक्ताचा जलवा असला तरी इकडे सोशल मीडियावर मात्र एका वेगळ्याच अभिनेत्रीची जोरदार चर्चा रंगली आहे. मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री गिरीजा ओकच्या (Girija Oak) एका नव्या फोटोशूटने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातलाय.

Girija Oak Photoshoot

तिने नुकतेच आयव्हरी रंगाच्या साडीतील काही अत्यंत सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. साडी, अगदी साधा मेकअप आणि त्यावर साजेसे पारंपरिक दागिने असा तिचा अस्सल मराठमोळा लूक पाहून नेटकरी पार घायाळ झालेत.

अत्यंत साध्या लूकमध्येही ती इतकी आकर्षक दिसत आहे की, चाहते तिला थेट ‘ड्रीम गर्ल’ आणि ‘नॅशनल क्रश’ म्हणत तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. या Girija Oak Photoshoot ची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे तिने नेसलेली पारंपरिक साडी. खुद्द गिरीजाने कॅप्शनमध्ये या साडीबद्दल सविस्तर माहिती दिलीय.

‘सोनावळ’ प्रकारातील ही कॉटन सिल्क साडी असून त्यावर जरीच्या सुंदर स्ट्रिप्स आहेत. पारंपरिक भाषेत साडीवरच्या अशा पॅटर्नला ‘सोनसळी रास्ता’ असं म्हणतात. तर याच्या आकर्षक सोनेरी पदराला ‘तवा पल्लू’ म्हटलं जातं. साडीवर असलेली पारंपरिक कात्यारी बॉर्डर तिच्या सौंदर्यात आणखीच भर घालत आहे.

मालिका, चित्रपट, नाटक आणि आता ओटीटी प्लॅटफॉर्म अशा सर्वच माध्यमांवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी गिरीजा नेहमीच चर्चेत असते. मराठी, हिंदी आणि कन्नड सिनेसृष्टीत तिने आजवर दमदार भूमिका साकारल्या आहेत. पण आता कान्सच्या धामधुमीत तिच्या या साध्या पण मोहक अंदाजाने चाहत्यांना मोठी भुरळ घातली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही