‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावचं शेतात फोटोशूट; ओळखणंही झालं कठीण, पाहून नेटकरी फिदा!

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावचे शेतातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिचा हा बदललेला अंदाज आणि आगामी सिनेमाची चर्चा सध्या जोरात आहे.

Published On: 

Namrata Sambherao Viral Photos: शेतात राबतेय 'हास्यजत्रा' फेम अभिनेत्री!

टीव्हीच्या पडद्यावर ग्लॅमरस दिसणारे कलाकार जेव्हा अचानक भर उन्हात शेतात काम करताना दिसतात, तेव्हा भुवया उंचावणारच ना? ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या शोमधून घराघरात पोहोचलेली आपली लाडकी ‘लॉली’ म्हणजेच अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) सध्या अशाच एका कारणामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. तिचे काही फोटो सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत, ज्यात ती चक्क शेतात राबताना दिसतेय.

नेहमीच आपल्या विनोदी टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या नम्रताचा हा साधेपणा पाहून चाहते भारावून गेले आहेत. सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय असलेल्या नम्रताने इन्स्टाग्रामवर हे खास फोटो शेअर केले आहेत.

Namrata Sambherao Viral Photos

यामध्ये तिचा लूक इतका बदलला आहे की, पहिल्या झटक्यात तिला ओळखणंही कठीण झालंय. या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. कुणी तिच्या साधेपणाचं कौतुक करतंय, तर कुणी तिला ‘मातीतली माणसं’ म्हणत डोक्यावर घेतलंय.

या फोटोंमागे एक खास कनेक्शन सुद्धा असू शकतं. सध्या नम्रता तिच्या आगामी ‘सुपर डुपर’ (Super Duperr) या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा म्हणजे भावनांचा एक गोतावळा असणार आहे, असं म्हटलं जातंय. हा कौटुंबिक महासोहळा येत्या ३ एप्रिल २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे हे फोटो या सिनेमाच्या प्रमोशनचा भाग आहेत की नम्रताचं हे शेतीप्रेम आहे, यावर आता जोरदार चर्चा रंगल्या आहेत. काहीही असो, नम्रताच्या या ‘गावरान’ अंदाजाने पुन्हा एकदा महाराष्ट्राला वेड लावलंय एवढं मात्र नक्की!

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही