🕒 1 min read
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्या नावाची चर्चा असते, ती म्हणजे ‘सबसे कातील’ गौतमी पाटील (Gautami Patil). तिचं नाव काढलं तरी तरुणाईमध्ये एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. लावणीच्या ठेक्यावर लाखो दिलांची धडकन बनलेली गौतमी आज कुणाची तरी ‘व्हॅलेंटाईन’ (Valentine) आहे का? हा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमीच सतावतो. आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने खुद्द गौतमीनेच यावरचा पडदा उचलला असून, आपल्या होणाऱ्या जोडीदाराबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे.
आज सगळीकडे प्रेमाचे वारे वाहत असताना, गौतमीने आपल्या मनातील गोष्टी शेअर केल्या. तिला जेव्हा विचारण्यात आलं की यंदा तुझा व्हॅलेंटाईन कोण? तेव्हा तिने स्पष्ट शब्दांत सांगितलं, “सध्या माझा कोणीही व्हॅलेंटाईन नाही. माझे कार्यक्रम आणि काम यातच मी व्यस्त आहे. मला यात फारसा इंटरेस्ट नाही.” तिच्या या उत्तराने अनेकांचा हिरमोड झाला असेल, पण तिने करिअरला पहिलं प्राधान्य दिलंय हे नक्की.
Gautami Patil Valentine
गौतमीला जोडीदार कसा हवाय, यावर ती जे काही बोलली त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गौतमी म्हणाली, “माझा पार्टनर हा अत्यंत समजूतदार असावा. माझ्या आयुष्यात आतापर्यंत अनेक चांगल्या-वाईट गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे माझा भूतकाळ (Past) स्वीकारणारा आणि मला समजून घेणारा जोडीदार मला हवाय. हीच माझी मुख्य अपेक्षा आहे.” गौतमीच्या या वक्तव्यावरून तिला असा जोडीदार हवाय जो तिच्या वादात आणि प्रसिद्धीच्या पलीकडे जाऊन तिला माणूस म्हणून स्वीकारेल.
प्रेमाची व्याख्या करताना तिने महागड्या गिफ्ट्सपेक्षा ‘वेळेला’ महत्त्व दिलं. “एकत्र छान जेवण करणं आणि एकमेकांना वेळ देणं, हेच खरं सेलिब्रेशन आहे,” असं साधेपणाने सांगत तिने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- उदित नारायण पुन्हा वादात; दारू पार्टीच्या VIDEO मुळे ट्रोल, गणपतीचा फोटो पाहताच नेटकऱ्यांचा संताप!
- राखी सावंतची ‘सटकली’; बिग बॉसच्या घरात थेट तोडफोड, ‘या’ स्पर्धकावर भडकली!
- बीसीसीआयचे नियम धाब्यावर? हार्दिकचा गर्लफ्रेंडसोबतचा व्हिडिओ व्हायरल अन् वर्ल्ड कपमध्ये खळबळ!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











