Share

राखी सावंतची ‘सटकली’; बिग बॉसच्या घरात थेट तोडफोड, ‘या’ स्पर्धकावर भडकली!

बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा राडा. राखी सावंतने रागाच्या भरात केली तोडफोड, सागरसोबतच्या वादाने घरातील वातावरण तापलं. नियमभंग केल्याने शिक्षा होणार?

Published On: 

Rakhi Sawant Angry: बिग बॉसच्या घरात तोडफोड! सागरवर भडकली

बिग बॉसच्या घरात शांतता असेल तर नवलच! आणि त्यात जर ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत (Rakhi Sawant) असेल, तर मनोरंजनाचा डोस डबल होणार हे नक्की. वाईल्ड कार्ड एन्ट्री घेऊन आलेल्या राखीने अल्पावधीतच घराचा ताबा घेतलाय. पण आता प्रकरण गंमतीजंमतीच्या पुढे गेलंय. घरातल्या एका वादावरून राखीचा पारा इतका चढला की तिने चक्क घराची तोडफोड सुरू केली आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi Season 6) नवीन प्रोमोमध्ये राखीचा रुद्र अवतार पाहायला मिळतोय. निमित्त ठरलंय ते बाथरुममधील अस्वच्छता. घरातल्या बाथरुममध्ये प्रचंड घाण साचल्याचं पाहून राखीचा तिळपापड झाला. तिने स्पर्धक सागरला (Sagar) ती घाण दाखवली आणि सफाई करायला सांगितलं. पण सागरनेही ताठर भूमिका घेत, “तू मला सांगू नकोस, मी वॉचमॅन नाहीये,” असं उत्तर दिलं. सागरच्या या उत्तराने आगीत तेल ओतण्याचं काम केलं.

Rakhi Sawant Angry

सागरचं बोलणं ऐकून राखी संतापली. “आम्ही स्वयंपाक करतो ना… ते तुम्ही खाता ना? मग नाटकं कशाला?” अशा शब्दांत तिने सागरला झापलं. हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात राखीने किचनमधील काचेचं भांडं फोडलं. तिच्या या तोडफोडीमुळे घरातील इतर सदस्यही हादरले आहेत.

बिग बॉसच्या घरात संपत्तीचं नुकसान करणं हा गंभीर नियमभंग (Rule Violation) मानला जातो. आता राखीच्या या कृत्यामुळे ‘बिग बॉस’ तिला काय शिक्षा देणार? की नेहमीप्रमाणे ‘टीआरपी क्वीन’ला माफी मिळणार? याकडे प्रेक्षकांचे डोळे लागले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही