📰
आमचं App डाउनलोड करा! ⭐⭐⭐⭐⭐
सर्वात आधी ताज्या बातम्या मिळवा — Free!
Download करा
Share

बीसीसीआयचे नियम धाब्यावर? हार्दिकचा गर्लफ्रेंडसोबतचा व्हिडिओ व्हायरल अन् वर्ल्ड कपमध्ये खळबळ!

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी हार्दिक पांड्याचा गर्लफ्रेंडसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बीसीसीआयने WAGs ला परवानगी नाकारली असताना हार्दिकने नियम मोडला का? यावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Published On: 

Hardik Pandya Viral Video: गर्लफ्रेंडमुळे अडचणीत? बीसीसीआय नाराज!

🕒 1 min read

मैदानावरची लढाई अजून सुरू व्हायची आहे, पण त्याआधीच भारतीय टीमच्या ड्रेसिंग रूमबाहेर ‘वेगळीच’ चर्चा रंगलीय… निमित्त ठरलाय तो भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya). १५ फेब्रुवारीला भारताचा पाकिस्तानशी महामुकाबला (IND vs PAK) होणार आहे, पण त्याआधीच कोलंबोमध्ये लँड होताना हार्दिकचा एक व्हिडिओ समोर आला आणि सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली.

टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी टीम इंडिया कोलंबोमध्ये दाखल झाली आहे. आर. प्रेमदासा स्टेडियमवर हा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. टीम बसमधून उतरताना किंवा एअरपोर्टवर इतर खेळाडू एकटेच किंवा टीम स्टाफसोबत दिसले. मात्र, व्हायरल व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मासोबत (Mahieka Sharma) दिसून आला. हा व्हिडिओ समोर येताच नेटकऱ्यांनी बीसीसीआयला (BCCI) प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. कारण, वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेत खेळाडूंचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून बोर्डाने कडक धोरण अवलंबल्याची चर्चा होती.

Hardik Pandya Viral Video

मिळालेल्या माहितीनुसार, या वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयने खेळाडूंना त्यांच्या पत्नी किंवा गर्लफ्रेंडला (WAGs) सोबत नेण्यास परवानगी नाकारली होती. सहसा ४५ दिवसांपेक्षा मोठ्या दौऱ्यात ठराविक काळानंतर (१४ दिवस) फॅमिलीला परवानगी मिळते. पण यावेळी बोर्डाने हा प्रस्ताव फेटाळल्याचं बोललं जातंय. असं असताना हार्दिकसोबत माहिकाची उपस्थिती बीसीसीआयच्या ‘पॉलिसीला कात्रजचा घाट’ घालणारी आहे का? असा सवाल आता उपस्थित होतोय.

हार्दिकने स्वतःच्या खर्चाने स्वतंत्र व्यवस्था केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण अधिकृत टीमसोबत गर्लफ्रेंड दिसल्याने ‘नियम फक्त इतरांनाच का?’ अशी कुजबूज क्रिकेट वर्तुळात सुरू झाली आहे. आता यावर बोर्ड काही ॲक्शन घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!