Share

स्मृती मानधनाच्या ‘त्या’ मित्राला हायकोर्टाने फटकारलं; पलाश मुच्छल प्रकरणात मोठा ट्विस्ट!

पलाश मुच्छलची बदनामी करणाऱ्या स्मृती मानधनाच्या मित्राला हायकोर्टाने चाप लावला आहे. विज्ञान मानेला पलाशवर आरोप करण्यास कोर्टाने मनाई केली असून १० कोटींच्या नोटीसने प्रकरण तापलंय.

Published On: 

Smriti Mandhana News: पलाश मुच्छलला हायकोर्टाचा दिलासा; मित्रावर कारवाई!

स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि पलाश मुच्छल (Palash Muchhal)… २३ नोव्हेंबरला यांचं लग्न होणार होतं, पण अचानक सगळं चित्र बदललं. लग्नाची तारीख टळली आणि सुरू झाला आरोपांचा खेळ. स्मृतीचा जवळचा मित्र आणि फिल्म प्रोड्युसर विज्ञान माने याने पलाशवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली होती. पण आता या प्रकरणात कोर्टाची एन्ट्री झाली असून, मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) विज्ञान मानेला कडक शब्दांत फटकारलं आहे.

स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांचं लग्न मोडल्याच्या चर्चांनंतर, स्मृतीचा बालपणीचा मित्र विज्ञान माने याने पलाशवर ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. केवळ पैसेच नाही, तर मीडिया आणि सोशल मीडियावर पलाश आणि त्याच्या कुटुंबावर चिखलफेक सुरू होती. या बदनामीला कंटाळून पलाशने थेट कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. पलाशने आपल्या वकिलामार्फत विज्ञान माने विरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता.

Smriti Mandhana News

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी स्पष्ट केलं की, हा मूळचा दोन व्यक्तींमधील ‘व्यावसायिक वाद’ (Commercial Dispute) आहे. त्यामुळे २३ नोव्हेंबरला जे काही घडलं (लग्न रद्द होणं), त्याचा आधार घेऊन सार्वजनिकरित्या बदनामी करणं चुकीचं आहे. कोर्टाने विज्ञान मानेला पलाश किंवा त्याच्या आईबद्दल कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर किंवा मीडियामध्ये बदनामीकारक विधाने करण्यास मनाई (Injunction) केली आहे.

पलाशची आक्रमक भूमिका स्वतःच्या आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का लागल्याने पलाश शांत बसला नाही. त्याने विज्ञान मानेला तब्बल १० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. “माझी इमेज खराब करण्यासाठी हे खोटे आरोप केले जात आहेत,” असं पलाशने इन्स्टाग्रामवर स्पष्ट केलं होतं. आता कोर्टाच्या या निर्णयामुळे पलाशला मोठा दिलासा मिळाला आहे, तर स्मृतीच्या मित्राच्या अडचणी वाढल्या आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install