Share

निक्की-अरबाजच्या प्रेमाला ‘धर्मा’ची भिंत? अरबाजनं गुडघ्यावर बसून प्रपोज केल्यानंतर निक्की ढसाढसा रडली

‘द 50’ रिअॅलिटी शोमध्ये अरबाज पटेलने प्रपोज केल्यानंतर निक्की तांबोळी ढसाढसा रडली. वेगळ्या धर्मामुळे वडिलांचा नात्याला तीव्र विरोध असल्याचा गौप्यस्फोट तिने केला आहे.

Published On: 

Nikki Tamboli News: अरबाजचं प्रपोजल आणि निक्कीचे अश्रू!

प्रेमात पडणं सोपं असतं, पण ते निभावताना जेव्हा स्वतःच्याच कुटुंबाचा कडवा विरोध असतो, तेव्हा नेमकी काय अवस्था होते? याचाच अत्यंत भावनिक प्रत्यय सध्या टेलिव्हिजनची स्टार अभिनेत्री निक्की तांबोळीला (Nikki Tamboli) येतोय.

‘बिग बॉस मराठी’च्या घरातून सुरू झालेली निक्की आणि अरबाज पटेल (Arbaaz Patel) यांची बहुचर्चित लव्हस्टोरी आता एका नव्या वळणावर पोहोचली आहे. सध्या हे दोघे कलर्सच्या ‘द 50’ (The 50) या नव्या रिअॅलिटी शोमध्ये एकत्र झळकत आहेत. याच शोमध्ये एका रोमँटिक क्षणी अरबाजने सगळ्यांसमोर गुडघ्यावर बसून निक्कीला ऑफिशियली प्रपोज केलं.

Nikki Tamboli News

पण, या आनंदाच्या क्षणी हसण्याऐवजी निक्कीला अचानक अश्रू अनावर झाले. ती स्टेजवरच ढसाढसा रडू लागली. यामागचं धक्कादायक कारण सांगताना तिने, “माझे वडील आमच्या नात्याच्या सक्त विरोधात आहेत, कारण आमचा धर्म वेगळा आहे,” असा मोठा गौप्यस्फोट केला. तिच्या या खुलाशामुळे सेटवरील उपस्थितांसह सोशल मीडियावरील चाहत्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत.

प्रपोज करताना अरबाजने आपल्या भावना अतिशय मोकळेपणाने व्यक्त केल्या. तो म्हणाला, “माझा राग फक्त निक्कीच शांत करू शकते. कलर्स वाहिनीनेच आमची जोडी बनवली होती, त्यामुळे तिथेच तिला प्रपोज करण्याची माझी आधीपासूनच इच्छा होती.”

गेल्या दीड वर्षांपासून हे दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत आहेत. वडिलांच्या विरोधाबद्दल बोलताना निक्की अत्यंत भावूक झाली. “माझ्या आईने मला स्वतःच्या प्रेमाचा त्याग कधीही न करायला शिकवलंय, त्यामुळे मी वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन अरबाजला खंबीर साथ देतेय,” असं ती म्हणाली. तिने अशीही आशा व्यक्त केली की, वडील कधीतरी या नात्याला समजून घेतील आणि अरबाजचा स्वीकार करतील.

दरम्यान, जोपर्यंत दोघांपैकी एक जण एखादा मोठा रिअॅलिटी शो जिंकत नाही, तोपर्यंत लग्नाचा विचार करणार नसल्याचंही निक्कीने स्पष्ट केलं आहे. आता या दोन वेगवेगळ्या धर्मांच्या प्रेमकहाणीला कुटुंबाची संमती मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install