Share

Suryakumar Yadav: नामीबियाचा खुर्दा केला, आता नंबर पाकिस्तानचा; विजयानंतर सूर्याने थेट शड्डूच ठोकला!

नामीबियावर ९३ धावांनी विजय मिळवत भारताने वर्ल्डकपमध्ये दणक्यात कामगिरी केली आहे. या विजयानंतर सूर्यकुमार यादवने पाकिस्तानला थेट इशारा दिला असून हार्दिक-बुमराहचं कौतुक केलंय.

Published On: 

IND vs NAM T20 World Cup: सूर्याने पाकिस्तानला डिवचले! विजयानंतर म्हणाला...

वर्ल्डकपच्या रणांगणात टीम इंडियाने नुसता विजय मिळवला नाही, तर पाकिस्तानला एक कडक इशाराच दिलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही! नामीबियासारख्या संघाला हलक्यात न घेता भारताने (IND vs NAM) ९३ धावांनी लोळवलं आणि आपली ताकद दाखवून दिली. १५ फेब्रुवारीला होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या ‘हायव्होल्टेज’ मॅचपूर्वी टीम इंडियाला सूर गवसलाय, हेच या विजयाने अधोरेखित केलंय.

सामना संपल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवचा आत्मविश्वास पाहण्यासारखा होता. विजयाचं कौतुक करतानाच त्याने पाकिस्तानलाही अप्रत्यक्षपणे डिवचलं आहे. सूर्या म्हणाला, “सुरुवातीला आम्ही थोडे सावध होतो, पण आता ‘गाडी ट्रॅकवर आली आहे’. पुढील प्रत्येक सामना आमच्यासाठी ‘करो या मरो’ असाच असेल आणि आम्ही त्यासाठी पूर्ण तयार आहोत.”

IND vs NAM T20 World Cup

या सामन्यात सलामीवीर ईशान किशनने अवघ्या २४ चेंडूत ६१ धावा कुटल्या, तर हार्दिक पांड्याने ५२ धावांची खेळी करत भारताला २०९ च्या मजबूत टप्प्यावर नेलं. यावर बोलताना सूर्याने हार्दिकचं विशेष कौतुक केलं. तो म्हणाला, “हार्दिक हा टीमचा असा हुकुमी एक्का आहे, जो नवीन बॉल, जुना बॉल आणि डेथ ओव्हर्समध्येही विकेट्स काढतो. त्याची बॅटिंग तर बोनस आहेच!”

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दुखापतीतून सावरलेल्या जसप्रीत बुमराहने ४ षटकात फक्त २० धावा देत १ विकेट घेतली. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीआधी बुमराहचा हा फॉर्म विरोधकांची झोप उडवण्यासाठी पुरेसा आहे, असे संकेतच सूर्याने दिले. नामीबियाचा डाव ११६ धावांत गुंडाळल्याने भारतीय गोलंदाजांचा आत्मविश्वास दुप्पट झाला आहे. आता साऱ्यांच्या नजरा १५ फेब्रुवारीच्या ‘महामुकाबल्या’कडे लागल्या आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install