🕒 1 min read
पुणे (Land Purchase Tips)- जमीन खरेदी करताना तुमची आयुष्यभराची कमाई एका क्षणात पाण्यात जाऊ शकते, असं म्हटलं तर? हो, हे ऐकायला थोडं धक्कादायक वाटेल, पण सध्या जमिनीच्या व्यवहारांत ज्या प्रकारे फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत, ते पाहता सावध राहणं कधीही चांगलं. म्हणूनच, जमीन घेताना नेमकं काय पाहायचं आणि स्वतःची फसवणूक कशी टाळायची, याची ही खास माहिती तुमच्यासाठी.
“अरे, ही तर माझी जमीन आहे, तुम्ही इथे कुंपण कसं काय घालताय?” – अशा प्रकारचे वाद तुम्ही अनेकदा ऐकले असतील. एकाच जमिनीचे दोन-दोन मालक तयार होणं किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यवहार होणं, हे सर्रास घडतंय. जमिनीच्या व्यवहारात फसवणूक होण्याचे प्रकार काही थांबताना दिसत नाहीत. त्यामुळे जमीन खरेदी Tips माहिती असणं खूप गरजेचं आहे.
सगळ्यात आधी काय कराल?
तर डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका. ज्याच्याकडून तुम्ही जमीन घेताय, तोच त्या जमिनीचा खरा मालक आहे का? हे तपासण्यासाठी ७/१२ (Satbara) आणि ८-अ (8A) उतारा आवर्जून तपासा. पण फक्त आजचा सातबारा पाहून भागणार नाही, तर किमान मागील ३० वर्षांचे ‘फेरफार’ (Mutation Entry) तपासा. यामुळे जमिनीचा मूळ मालक कोण होता आणि ती जमीन कोणाकोणाकडे हस्तांतरित झाली, याचा पूर्ण इतिहास तुम्हाला समजेल.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीचा ‘भोगवटादार वर्ग’. जर सातबारावर ‘भोगवटादार वर्ग-२’ अशी नोंद असेल, तर ती जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय विकता येत नाही. अशी जमीन खरेदी करणं तुमच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं. धक्कादायक माहिती अशी आहे की, अनेकदा बँकेत गहाण असलेली जमीन सुद्धा परस्पर विकली जाते. त्यामुळे बँकेचं ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) आणि ‘भार प्रमाणपत्र’ (Encumbrance Certificate) तपासायला विसरू नका.
असं असलं तरी, कागदपत्रं बरोबर वाटली तरी प्रत्यक्षात जागेवर जाऊन जमिनीची मोजणी आणि चतुःसीमा तपासा. आजूबाजूच्या लोकांशी बोलून त्या जमिनीवर काही वाद सुरू आहे का, याची चौकशी करा. व्यवहारापूर्वी वर्तमानपत्रात ‘जाहीर प्रगटन’ (Public Notice) द्यायला विसरू नका, जेणेकरून कोणाची हरकत असेल तर ती समोर येईल. थोडक्यात काय, तर घाईघाईत व्यवहार करण्यापेक्षा वकिलाचा ‘सर्च रिपोर्ट’ घेणं कधीही सुरक्षित ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- Real Estate Market मध्ये मोठी उलथापालथ; फडणवीसांच्या निर्णयाने सामान्यांचे घर स्वस्त होणार?
- Devendra Fadnavis यांचा मोठा निर्णय; आता जमिनीसाठी NA ची कटकट कायमची संपली, पाहा काय बदललं!
- ‘बिग बॉसच्या घरात मी मरणाच्या दारात होते, तरीही…’; घरातून बाहेर पडताच दिव्या शिंदेचा मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











