Share

श्रेयस अय्यर होणार नवा कर्णधार? टीम इंडियात मोठा भूकंप, सूर्याची सुट्टी होणार?

सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्ममुळे बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आगामी टी-२० मालिकेपूर्वी श्रेयस अय्यरची नवा कर्णधार म्हणून निवड होण्याची दाट शक्यता आहे.

Published On: 

Team India T20 Captain - Shreyas Iyer in Indian jersey.

टी-२० विश्वचषक आणि आयपीएल २०२६ मधील सुमार कामगिरीमुळे टीम इंडियात आता मोठा भूकंप होणार का? हा प्रश्न सध्या क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चेत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय आता टी-२० संघाच्या कर्णधारपदात मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यापूर्वी नवा कर्णधार जाहीर होऊ शकतो, ज्यात श्रेयस अय्यरचं (Shreyas Iyer) नाव सर्वात आघाडीवर आहे.

Team India T20 Captain

सध्याचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) बॅटने सातत्याने अपयशी ठरतोय. धक्कादायक माहिती म्हणजे, २०२५ मध्ये त्याला एकही अर्धशतक झळकावता आलं नाही. विश्वचषकातही तो फ्लॉपच ठरला. त्यामुळेच आता त्याला हटवण्याबाबत बीसीसीआयमध्ये खलबतं सुरू आहेत.

मुळात रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या सांगण्यावरून सूर्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. पण आता त्याच्या खराब फॉर्ममुळे संघाला फटका बसू नये, म्हणून बीसीसीआय कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. पुढील दोन टी-२० विश्वचषकांचा विचार करता, निवड समितीला दीर्घकाळ संघाचे नेतृत्व करू शकेल असाच खेळाडू हवा आहे.

दुसरीकडे, श्रेयस अय्यरने केवळ आयपीएलमध्येच नाही, तर देशांतर्गत क्रिकेटमध्येही आपली चुणूक दाखवली आहे. २०२४ मध्ये त्याच्याच नेतृत्वात मुंबईने ‘सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी’ जिंकली होती. या स्पर्धेत त्याने केवळ नेतृत्वच केलं नाही, तर ९ सामन्यांत ३४५ धावा कुटल्या होत्या. याशिवाय, इंडिया-ए संघाचं नेतृत्व करतानाही त्याने यश मिळवलं आहे.

कर्णधारपदासाठी श्रेयसचं नाव जवळपास निश्चित मानलं जात असलं, तरी उपकर्णधारपदासाठी मात्र मोठी चुरस आहे. युवा स्टार तिलक वर्मा आणि ईशान किशन या दोघांपैकी एकाच्या गळ्यात उपकर्णधारपदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे. आता बीसीसीआय अधिकृतपणे काय निर्णय घेतं, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही