Share

दिल्लीत विद्यार्थ्यांचे रौद्र आंदोलन; राहुल-प्रियंका मैदानात, मोदी निवासाबाहेर काँग्रेसचे धरणे

दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी मैदानात उतरले असून, पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसने धरणे आंदोलन सुरू केले आहे.

Published On: 

Rahul Gandhi

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एका आंदोलनाने सध्या लक्ष वेधून घेतले आहे. अंतिमत: लाखो तरुण जमा झाले असून, विद्यार्थी आपल्या आंदोलनासाठी आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या नेतृत्वात सोमवारी जंतरमंतर (JantarMantar) मैदानाहून संसदेच्या दिशेला निघालेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीर्जमध्ये अनेक तरुण गंभीर झालेले असून, याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे प्रमुख अभिजीत दीपके पुन्हा एकदा जंतरमंतर आंदोलन करत आहेत. आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) हे देखील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मैदानावर उतरले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे निदर्शक जमले आहेत. ते पंतप्रधानांविरोधात घोषणाबाजी करत आहेत. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ तरुण तिथे धरणे आंदोलन करत आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले असून, राहुल गांधीही या धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत.

राहुल गांधींसह काँग्रेसचे अनेक खासदार निषेध व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर जमले. आंदोलकांनी काही काळ जोरदार घोषणाबाजी केली. साधारण पाच ते दहा मिनिटांच्या घोषणांनंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. तरीही, आंदोलकांचे धरणे आंदोलन सुरूच आहे. राहुल गांधी आंदोलकांमध्ये उभे आहेत. दरम्यान, पोलीस आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

दिल्लीतील पक्षाच्या आंदोलनावर महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली. “राहुल गांधींनी अनेक दिवसांपासून हा मुद्दा लावून धरला आहे. हे जे भयाचं वातावरण आहे त्या विरोधात राहुल गांधींनी घाबरु नका असा संदेश दिला होता,” असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही