Share

‘देशातील तरुणांच्या पाठीशी ठाम उभे आहोत’; रितेश-जेनेलियाची पोस्ट चर्चेत

दिल्लीतील NEET आंदोलनाला पाठिंबा देत रितेश आणि जेनेलिया देशमुख यांनी भारतीय तरुणांचा आवाज ऐकला गेला पाहिजे, असे सांगत सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली.

Published On: 

Ritesh-Genelia

मुंबई: NEET पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ यांमुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी करत, विद्यार्थी गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करत आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच सोमवारी, विद्यार्थ्यांनी संसद भवनाच्या दिशेने मोर्चा काढला. यावेळी विद्यार्थी आणि पोलीस यांच्यात मोठा संघर्ष झाला, ज्यामध्ये अनेकजण जखमी झाले. या घटनेचे पडसाद संसदेतही उमटले. राज्यसभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हा मुद्दा उपस्थित करताच सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. या संघर्षाची दृश्ये सोशल मीडियावरही झळकली आणि अनेक सेलिब्रिटींनी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला जोरदार पाठिंबा दर्शवला. अशा परिस्थितीत, महाराष्ट्रातील लोकप्रिय जोडी रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांनीही विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला उघडपणे पाठिंबा दिला आहे.

पोस्टमध्ये नेमके काय म्हटले?

रितेश देशमुख यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक ‘स्टोरी’ शेअर करून तरुणांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “आम्ही देशातील तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. त्यांचा आवाज मोठ्याने, स्पष्ट आणि निर्भयपणे ऐकला गेला पाहिजे. हे तरुणच आपल्या लोकशाहीचा श्वास आहेत आणि आपल्या राष्ट्राच्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत.”

या मराठी अभिनेत्याने आपल्या पोस्टद्वारे इतरांनाही आवाहन केले. “चला, आपण त्यांचे म्हणणे ऐकून घेऊया, त्यांना पाठिंबा देऊया आणि त्यांना सक्षम करूया… आपल्या तरुणांची ऊर्जा, धैर्य आणि स्वप्नेच… आपण ज्या भारताची निर्मिती करू इच्छितो, त्याला आकार देतील.” असे रितेश यांनी लिहिले. त्यांनी आपली पोस्ट “जय हिंद…” या शब्दांनी संपवली. पोस्टच्या शेवटी रितेश यांनी ‘जेनेलिया आणि रितेश देशमुख’ अशी स्वाक्षरी केली. तसेच, त्यांनी #YouthOfIndia, #VoiceOfTheYouth आणि #FutureOfOurNation असे हॅशटॅग वापरून भारतीय तरुण, तरुणांचा आवाज आणि देशाचे भविष्य यांवर प्रकाश टाकला.

प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांच्यासोबतच इतर अनेक सेलिब्रिटींनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. किंबहुना, सोमवारी झालेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अनेक सेलिब्रिटी दिल्लीत उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि अभिनेते नसीरुद्दीन शाह व प्रकाश राज यांसारख्या दिग्गज व्यक्ती आंदोलनात सक्रियपणे सहभागी होताना दिसल्या. अनेक मराठी कलाकारांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे; सयाजी शिंदे यांच्यासह शल्मली खोलगडे आणि इतर अनेक सेलिब्रिटींनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला असून, विद्यार्थ्यांचे म्हणणे तरी किमान ऐकून घेतले जाईल, अशी आशा व्यक्त केली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही