Share

‘पोलिसांनी मुलींना बेदम मारहाण केली, मला माफ करा’; अभिजित दिपकेंनी पोलिसांच्या कारवाईवर नेमकं काय म्हटलंय?

दिल्लीत पुरुष पोलिसांनी विद्यार्थिनींना केलेल्या मारहाणीनंतर अभिजित दिपके यांनी जाहीर माफी मागत सरकारवर आणि दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

Published On: 

Abhijeet Dipke protesting against Dharmendra Pradhan and Delhi Police

दिल्ली– एका केंद्रीय मंत्र्याला वाचवण्यासाठी सरकार विद्यार्थ्यांच्या रक्ताची होळी खेळायला तयार आहे का? असा संतप्त सवाल आता राजधानीतून विचारला जाऊ लागला आहे.

दिल्लीमध्ये नुकत्याच झालेल्या आंदोलनादरम्यान पुरुष पोलिसांनी विद्यार्थिनींना अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर विद्यार्थी नेते अभिजित दिपके यांनी तीव्र संताप व्यक्त करत आंदोलक विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागितली आहे.

धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांवर हल्ले?

“ज्या मुलींना पुरुष पोलिसांनी बेदम मारहाण केली, त्यांची मी माफी मागतो. दिल्ली पोलिसांच्या या अमानवीय कारवाईपासून मी तुम्हाला वाचवू शकलो नाही, याची मला खंत आहे,” अशा भावनिक शब्दांत अभिजित दिपके (Abhijeet Dipke) यांनी आपल्या भावना मांडल्या.

२० हून अधिक विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी हे सरकार आणखी तरुणांचे रक्त सांडायला तयार असल्याचे दिपके म्हणाले.

दुसरीकडे, या घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांनी थेट मेसेज करून (DM) संपर्क साधावा, मी स्वतः बोलून माफी मागेन, असे आवाहन त्यांनी केले. आपण हा लढा इथून पुढेही असाच सुरू ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी या पोस्टमधून व्यक्त केला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही