Share

‘सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज दडपला’; दिल्लीतील लाठीचार्जवर सुप्रिया सुळेंचा संताप

दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध करत सुप्रिया सुळे यांनी सरकारने दडपशाहीऐवजी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा, अशी मागणी केली.

Published On: 

Supriya Sule

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) तर्फे NEET परीक्षेतील अनियमिततेबाबत आंदोलन सुरू आहे. अभिजीत दिपके यांनी संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, आंदोलक संसदेच्या परिसराजवळ पोहोचताच त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेत अनेक आंदोलक जखमी झाले. या लाठीचार्जवर (Lathicharge) प्रतिक्रिया देताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जंतर-मंतरवरील घटनांचे वर्णन ‘धक्कादायक’ आणि मन हेलावून टाकणारे असे केले.

जंतर-मंतरवरील धक्कादायक घटना

दिल्लीतील लाठीचार्जबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले: “आज जंतर-मंतर येथे जे घडले ते अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारे आहे. तेथे जमलेले तरुण गुन्हेगार नव्हते. ते विद्यार्थी होते. असंख्य कुटुंबांच्या आणि आपल्या देशाच्या आशा-आकांक्षा घेऊन पुढे जाणारे युवक-युवती. आपल्या चिंता आणि मागण्या व्यक्त करण्याचा घटनात्मक अधिकार त्यांनी शांततेच्या मार्गाने बजावला होता. मात्र, संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लोकशाहीत आपल्या नागरिकांशी अशा प्रकारे वागले जाऊ नये.”

सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे. “एक भारतीय, लोकप्रतिनिधी आणि आई म्हणून ही घटना मला अत्यंत वेदनादायी आणि अस्वीकार्य वाटते. त्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आपल्याच मुला-मुलींचे प्रतिबिंब दिसते. कोणताही पालक आपल्या मुलाला किंवा मुलीला देशाच्या राजधानीत शांततापूर्ण पद्धतीने आपला आवाज उठवल्याबद्दल मारहाण होऊन परत यावे, अशी अपेक्षा करत नाही.”

सरकारने जनतेचा आवाज ऐकला पाहिजे

सुळे यांनी पुढे म्हटले: “लोकशाहीवर खऱ्या अर्थाने विश्वास असलेल्या सरकारने लोकांचा आवाज दडपण्याऐवजी तो ऐकण्याचे धैर्य दाखवले पाहिजे. सरकारने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी सहानुभूतीपूर्वक संवाद साधावा, त्यांच्या रास्त आणि प्रामाणिक मागण्यांवर अर्थपूर्ण चर्चा करून तोडगा काढावा आणि आपल्या प्रजासत्ताकाची ओळख असलेल्या लोकशाही मूल्यांचे रक्षण करावे.”

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही