Share

‘विश्वगुरू झुरळांना घाबरतात’; CJP आंदोलनावरून सुषमा अंधारेंचा केंद्र सरकारवर घणाघात

दिल्लीतील CJP आंदोलनावरून शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप केला.

Published On: 

Sushma Andhare

दिल्ली: राजधानी दिल्लीत ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) द्वारे सुरू असलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अभिजीत दिपके (Abhijit Dipke) यांच्या नेतृत्वाखाली संसदेच्या दिशेने मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनादरम्यान निदर्शकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्याचे वृत्त समोर आले. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (Shivsena) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केंद्र सरकारवर कडक शब्दांत टीका केली. (Delhi News)

‘लोकशाही शेवटचा घटका मोजत आहे’

सुषमा अंधारे म्हणाल्या, “भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असल्याचा दावा केला जातो. तरीही, आंदोलकांच्या मागण्यांवर चर्चा करण्याऐवजी आंदोलन दडपण्यावरच अधिक भर दिला जात असल्याचे दिसते. सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांना आंदोलनस्थळावरून हटवण्यासाठी वापरण्यात आलेल्या पांढऱ्या चादरींचा संदर्भ देत त्यांनी आरोप केला की, “पांढऱ्या चादरींचा वापर शेवटच्या क्षणी केला जातो. लोकशाहीचाच शेवट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”

‘विश्वगुरू झुरळांना घाबरतात’

केंद्र सरकारवर (Centre Government) टीका करताना अंधारे म्हणाल्या की, सत्तेत बसलेले लोक जे पाकिस्तानशी चर्चा करण्याचा सल्ला देतात. ते स्वतःच्या देशातील नागरिकांशी संवाद साधण्यास तयार नाहीत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी हा वेगळा मुद्दा असला, तरी सरकार चर्चेसाठीही तयार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. “याचा अर्थ विश्वगुरू झुरळांना घाबरतात,” असे उपरोधिकपणे म्हणत त्यांनी लोकशाही धोक्यात असल्याचे प्रतिपादन केले.

ठाकरे गटाचा CJP च्या आंदोलनाला पाठिंबा

सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या आंदोलनाबाबत सतत संपर्कात आहेत. CJP पक्षाचे नेते अभिजीत दिपके, सोनम वांगचुक आणि आंदोलनातील इतर सहभागींशी नियमितपणे संवाद साधत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या आंदोलनाला पक्षाचा पूर्ण पाठिंबा कायम राहील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान, दिल्लीतील या आंदोलनांमुळे केंद्र सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत असून, आगामी काळात या आंदोलनांचे राजकीय पडसाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही