🕒 1 min read
मुंबई : भारतीय टी-20 संघाचा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरवर (Shreyas Iyer) सध्या मोठा दबाव आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला सलग पराभवांना सामोरे जावे लागल्याने सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. अशा परिस्थितीत आता त्याची बहीण श्रेष्ठा अय्यर (Shresta Iyer) त्याच्या समर्थनार्थ पुढे आली असून, ट्रोल (Trolling) करणाऱ्यांना तिने सडेतोड उत्तर दिले आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत पाच टी-20 सामने खेळले असून संघाला एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. आयर्लंडविरुद्धची मालिका 0-2 अशी गमावल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही भारताला निराशाजनक कामगिरीचा सामना करावा लागला. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, तर पुढील दोन्ही सामने भारताने गमावले. त्यामुळे कर्णधार म्हणून श्रेयसच्या निर्णयक्षमतेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
‘प्रत्येक महान कर्णधारही हरला आहे’
फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत श्रेष्ठा अय्यर म्हणाली, “क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. खेळपट्टी, परिस्थिती आणि अनेक गोष्टी निकालावर परिणाम करतात. केवळ पराभव पाहून एखाद्या कर्णधाराचे मूल्यमापन करणे योग्य नाही. विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांसारख्या खेळाडूंनीही अनेक सामने गमावले आहेत. तरी त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले नाही.”
‘फक्त श्रेयसलाच का लक्ष्य करता?’
श्रेष्ठा पुढे म्हणाली, “जर सतत श्रेयस अय्यरलाच लक्ष्य केले जात असेल, तर त्यामागे वेगळे कारण असू शकते. त्याच्या नेतृत्वातील चांगल्या कामगिरीकडेही पाहायला हवे. प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत चढ-उतार येतात आणि श्रेयसही त्याला अपवाद नाही.”
‘तो भारतातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक ठरेल’
भावावर विश्वास व्यक्त करत श्रेष्ठा म्हणाली, “श्रेयस अय्यरमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्याची प्रतिमा आणि काम करण्याची पद्धत वेगळी आहे. योग्य वेळ आल्यावर तो भारतातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक म्हणून ओळखला जाईल. सध्याच्या निकालांवरून त्याच्याबद्दल अंतिम मत बनवणे चुकीचे ठरेल.”
इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळवणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. मालिका बरोबरीत आणण्यासाठी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची खरी परीक्षा याच सामन्यांमध्ये होणार असून, चाहत्यांच्या नजरा आता त्याच्या कामगिरीकडे लागल्या आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- Maharashtra UCC: महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी 7 सदस्यीय समिती जाहीर; कोण आहेत सदस्य?
- Mamata Banerjee: तृणमूल काँग्रेसला हायकोर्टाचा मोठा दिलासा; बँक खात्यातून व्यवहारास सशर्त परवानगी
- Taarak Mehta Fame Tanmay Vekaria: ‘बाघा’ची भूमिका साकारताना पाठदुखीचा त्रास; तन्मय वेकारियाचा मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












