Share

Mamata Banerjee: तृणमूल काँग्रेसला हायकोर्टाचा मोठा दिलासा; बँक खात्यातून व्यवहारास सशर्त परवानगी

तृणमूल काँग्रेसच्या बँक खात्यातून दैनंदिन खर्चासाठी व्यवहार करण्यास कोलकाता हायकोर्टाने सशर्त परवानगी दिली. न्यायालयाने पोलिसांच्या पुराव्यांवरही प्रश्न उपस्थित केले.

Published On: 

Mamta Banerjee

🕒 1 min read

कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींमध्ये तृणमूल काँग्रेसला (Trinamool Congress) .मोठा दिलासा मिळाला आहे. पक्षाच्या बँक खात्यावरील निर्बंधांबाबत कोलकाता हायकोर्टाने (Kolkata High Court) महत्त्वाचा निर्णय देत दैनंदिन खर्चासाठी खात्यातून व्यवहार करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, या व्यवहारांवर न्यायालयाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याची देखरेख असणार असल्याची अटही घालण्यात आली आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षाला नियमित प्रशासकीय आणि दैनंदिन खर्च भागवण्यासाठी बँक खात्यातून निधी वापरता येणार आहे. मात्र, प्रत्येक आर्थिक व्यवहार न्यायालयाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखालीच केला जाईल. त्यामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले

पोलिसांच्या कारवाईवर न्यायालयाचे प्रश्न

सुनावणीदरम्यान न्यायालयाने पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित केले. पक्षाचे बँक खाते गोठवण्यासाठी सादर करण्यात आलेले पुरावे पुरेसे आणि समाधानकारक नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच तपास यंत्रणांना आवश्यक पुरावे सादर करण्यात अपयश आल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. या प्रकरणात न्यायालयाने आणखी एक महत्त्वाची अट घातली आहे. निवडणूक आयोगाकडून अंतिम निर्णय येईपर्यंत बंडखोर खासदारांना या प्रकरणाशी संबंधित नियुक्त अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येणार नाही. त्यामुळे हा निर्णय बंडखोर गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

ED च्या चौकशीनंतर खाते गोठवले

तृणमूल काँग्रेसशी संबंधित कथित निधी प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी चौकशी सुरू केली होती. सुमारे 440 कोटी रुपयांच्या निधीशी संबंधित बँक खात्यांची तपासणी करण्यात आली होती. या प्रकरणात विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली आणि त्यानंतर पक्षाचे बँक खाते गोठवण्यात आले होते.

हायकोर्टाच्या ताज्या निर्णयामुळे तृणमूल काँग्रेसला आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने घातलेल्या अटींचे पालन करत पक्षाला दैनंदिन कामकाज सुरू ठेवता येणार असून, या निर्णयाकडे पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात महत्त्वाच्या घडामोडी म्हणून पाहिले जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही