Share

“मित्रच मैत्रिणीवर बलात्कार करत असेल तर काय करणार?” खासदाराचं वादग्रस्त विधान

TMC MP Kalyan Banerjee’s controversial statement on Kolkata rape case sparks outrage.

Published On: 

Law student gang-raped in Kolkata rape case college, TMC student leader arrested

🕒 1 min read

कोलकाता: कोलकातामधील एका विधी महाविद्यालयात विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याने पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेवरून सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाला विरोधकांनी धारेवर धरले असतानाच, टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी ( Kalyan Banerjee ) यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे नवा गदारोळ निर्माण झाला आहे. “जर एखादा मित्रच मैत्रिणीवर बलात्कार करत असेल, तर आपण त्यात काय करू शकतो?” असे धक्कादायक विधान बॅनर्जी यांनी केले आहे.

सेरामपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेल्या कल्याण बॅनर्जी यांनी कोलकाता बलात्कार प्रकरणावर बोलताना महिलांना ‘घाणेरड्या मानसिकतेच्या लोकांपासून दूर राहण्याचा’ सल्ला दिला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांना विचारण्यात आले की, जर एखादा विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा करत असेल, तर अशावेळी कोणती खबरदारी घ्यावी? यावर प्रतिप्रश्न करत बॅनर्जी म्हणाले, “आता आपण शाळा-महाविद्यालयांतही पोलीस ठेवायचे का?”

TMC MP Kalyan Banerjee’s controversial rape statement

आपल्या विधानाचे स्पष्टीकरण देताना कल्याण बॅनर्जी ( Kalyan Banerjee ) म्हणाले, “विधी महाविद्यालयात घडलेल्या घटनेचे मी अजिबात समर्थन करत नाही. आरोपींना अटक होऊन त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. काही निवडक पुरुष अशा प्रकारचा गुन्हा करत असतात.” मात्र, त्यानंतर त्यांनी वादग्रस्त विधान केले, “पण जर मित्रच मैत्रिणीवर बलात्कार करत असेल, तर काय करू शकतो? आता शाळांमध्येही पोलीस असतील का? या प्रकरणात एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याविरोधात गुन्हा केला. अशावेळी पीडितेचे रक्षण कोण करणार?” मानसिकतेत बदल झाल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत, असे बॅनर्जी यांनी म्हटले.

नेमके काय घडले आहे?

कोलकाता येथील एका विधी महाविद्यालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. २४ वर्षीय विद्यार्थिनीवर महाविद्यालयाच्या आवारातच माजी विद्यार्थी आणि दोन विद्यार्थ्यांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुख्य आरोपी मोनोजित मिश्रा हा याच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असून, सध्या तो अलीपूर पोलीस ठाणे आणि सत्र न्यायालयात फौजदारी वकील म्हणून कार्यरत आहे. तर इतर दोन आरोपी महाविद्यालयात सध्या शिकत आहेत. या घटनेमुळे पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही