Share

हिंदी सक्तीवरून भाजपची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका: ‘हे तर पुतना मावशीचे प्रेम’

BJP slams Uddhav Thackeray over compulsory Hindi, calls it ‘Putana Mavshi’s love’.

Published On: 

BJP's Keshav Upadhye criticizes Uddhav Thackeray over compulsory Hindi, questioning his 'Marathi love' citing Marathi school decline.

🕒 1 min read

मुंबई: राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयावरून महाराष्ट्रात राजकीय रणकंदन पेटले आहे. या निर्णयाला ठाकरे बंधूंनी तीव्र विरोध दर्शवला असून, ५ जुलै रोजी मुंबईत याविरोधात मोर्चा काढण्याची घोषणाही करण्यात आली आहे. एकीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करण्याचे निर्देश दिल्याची चर्चा असताना, दुसरीकडे भाजपने त्यांना ‘पुतना मावशीचे प्रेम’ म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये ( Keshav Upadhye ) यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यमावर एक पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उपाध्ये यांनी लिहिले आहे की, “…हे तर पुतना मावशीचे प्रेम. उद्धव ठाकरे यांनी मराठी सक्तीच्या जीआरची होळी करण्याचा आदेश दिला आहे. मराठी सक्ती सांगणाऱ्या जीआरची होळी? हे यांचं मराठी प्रेम?”

BJP Keshav Upadhye slams Uddhav Thackeray

उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळातील निर्णयांवरूनही त्यांना घेरले. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उर्दू भवनची घोषणा केली, त्यावेळी मराठी शाळांच्या दुरावस्थेची आठवण आली नाही? मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना वर्षानुवर्षे सत्तेवर होती. मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांची संख्या गेल्या १५ वर्षात ४०० वरून २८० पर्यंत खाली आली. याच शाळांतील विद्यार्थी संख्याही लाखांहून ३५ हजारांवर आली. काही शाळा बंद कराव्या लागत आहेत. कुठे गेलं उद्धव ठाकरे यांचं मराठी प्रेम?”, असे सवाल उपाध्ये ( Keshav Upadhye ) यांनी उपस्थित केले आहेत.

याचवेळी, केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षालाही लक्ष्य केले. हिंदी सक्तीविरोधी मोर्चात सहभागी होण्याच्या त्यांच्या भूमिकेवर उपाध्ये यांनी आक्षेप घेतला. “सांगण्यासारखा आणखी एक मुद्दा…, शरद पवार गटाने २०२० मध्ये हिंदी भाषा जोडो अभियान केले होते, त्याचं उद्घाटन जयंत पाटील यांनी केले होते. आता ते हिंदी विरोधी मोर्चात सहभागी होत आहेत,” असे म्हणत उपाध्ये ( Keshav Upadhye )  यांनी राष्ट्रवादीच्या दुहेरी भूमिकेवर बोट ठेवले. राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयावरून राज्यातील राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत. ५ जुलै रोजी निघणाऱ्या मोर्चाकडे आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!