🕒 1 min read
मुंबई: मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. ‘कांटा लगा’ या गाण्यामुळे प्रचंड लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. मुंबईतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (अंधेरी) येथे तिला मृतावस्थेत आणण्यात आलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तिच्या ( Shefali Jariwala ) अकाली निधनाने चाहत्यांना आणि सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेफालीला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तिचा पती, अभिनेता पराग त्यागी याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शेफालीच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर, तिचा पती पराग त्यागीचा रुग्णालयाबाहेरील व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. इन्स्टंट बॉलीवूडने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये पराग त्यागी कारमध्ये बसून रुग्णालयातून जाताना दिसत आहे.
Shefali Jariwala passed away at 42
शेफालीच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर, तिचा मृतदेह पुढील तपासणीसाठी कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तिच्या निधनावर चाहत्यांना विश्वास बसत नाहीये. सोशल मीडियावर अनेक चाहते ‘कांटा लगा गर्ल’ला श्रद्धांजली वाहत आहेत.
दरम्यान, शेफाली जरीवाला ‘कांटा लगा’ या गाण्यामुळे घराघरात पोहोचली होती. तिने ( Shefali Jariwala ) अभिनेता पराग त्यागीसोबत लग्न केलं होतं. या दोघांनी ‘नच बलिए’ या लोकप्रिय डान्स रिॲलिटी शोमध्येही भाग घेतला होता. तसेच, सलमान खान, अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा यांच्या ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटातही तिने खास भूमिका साकारली होती.
📌 महत्वाच्या बातम्या
- हिंदी सक्तीविरोधात ठाकरे-मनसेच्या मोर्चात राष्ट्रवादी उतरणार; Supriya Sule यांनी स्पष्ट केली भूमिका!
- दातदुखीने हैराण आहात? ‘हे’ घरगुती उपाय आहेत रामबाण, लगेच मिळेल आराम!
- विदेशी मद्य उद्योगाला परवान्यांची खैरात? मंत्रिमंडळात खळबळ, ‘लाडकी बहिण’ योजनेमुळे तिजोरीत खडखडाट!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








