Share

“हिंदू मुली जेव्हा संबंध ठेवतात…”, कंगना राणौतच्या नव्या विधानाने मोठी खळबळ!

कंगना राणौतचा नवा व्हिडिओ व्हायरल. हिंदू मुलींचे धर्मांतर आणि इस्लामिस्ट संबंधांवरून केले मोठे विधान, म्हणाली “मलाही संघी व्हायचंय”.

Published On: 

Kangana Ranaut speaking in a viral instagram video about hindu girls

बॉलीवूडची ‘पंगा क्वीन’ कंगना राणौत (Kangana Ranaut) आणि वाद, हे समीकरण आता नवीन राहिलेलं नाही. पण आता तिने थेट हिंदू मुलींच्या (Hindu Girls) धर्मांतरावरून असा काही दावा केलाय, ज्यामुळे नवा वाद पेटण्याची दाट शक्यता आहे. कंगना नेमकं काय म्हणालीये?

संसदेत जाण्यापूर्वी कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याची चर्चा आहे. ‘जेव्हा हिंदू मुली इस्लामिस्टच्या संपर्कात येतात, तेव्हा त्यांची विचारसरणी पूर्णपणे बदलते,’ असा मोठा गौप्यस्फोट कंगनाने केला आहे.

Kangana Ranaut Controversy

कंगना एवढ्यावरच थांबली नाही. “चित्रपटसृष्टीत अशा अनेक मुली आहेत ज्या धर्माबाबत तटस्थ असतात. मात्र, मैत्री किंवा लग्न झाल्यावर त्या कट्टरपंथी बनतात,” असं ती म्हणाली. संविधानाने धर्मस्वातंत्र्य दिलं असलं, तरी हिंदू मुलींच्या बाबतीतच ही विचारसरणी का बदलते? असा सवाल तिने उपस्थित केला आहे.

स्वतःच्या जुन्या वक्तव्यांचा संदर्भ देत कंगनाने स्पष्ट केलं की ती आधी मध्यममार्गी हिंदू होती. पण आता तिला भाजप आणि आरएसएसची विचारधारा स्वीकारायची आहे. “मला संघी व्हायचंय. मला निश्चित आणि जागृत हिंदू व्हायचंय. तर माझ्यासाठी हा मार्ग का बंद आहे?” असा थेट सवाल तिने विचारला आहे.

समाजाचे ठेकेदार अग्निपरीक्षा घेतात, पण हिंदू मुलींना धर्मांतर करायचे असेल तर त्या का होऊ शकत नाहीत, असा मुद्दा तिने मांडला. तिचा हा स्पष्टवक्तेपणा चाहत्यांना आवडला असून सोशल मीडियावर तिला ‘शेरनी’चा टॅग दिला जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही