संभाजीनगर : “जर मी सरकारविरुद्ध बोललो किंवा प्रश्न विचारले, तर माझ्या मागे ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) ला लावले जाते. जर तुम्ही माझ्याकडे ईडीला पाठवत असाल, तर त्यासोबत पंतप्रधानांची पदवीही पाठवा. मी माझी पदवी, शिष्यवृत्तीचा तपशील आणि कर्जाची कागदपत्रे सार्वजनिक करण्यास तयार आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींची पदवीही सार्वजनिक केली जावी.” या मागणीसह, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजित दिपकेने सोमवारी पुन्हा एकदा सरकारला आव्हान दिले.
बुधवारी (५ ऑगस्ट) होणाऱ्या CJP च्या प्रवक्ते आणि कोअर टीमच्या बैठकीपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत अभिजित दिपकेने केंद्र सरकारवर टीका केली आणि विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, जर पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) त्यांची शैक्षणिक पदवी सार्वजनिक केली, तर ते स्वतःची शैक्षणिक पात्रता आणि संबंधित सर्व कागदपत्रे जनतेसमोर मांडण्यास तयार आहेत.
CJP founder Abhijit Dipke challenges the PM Modi
सार्वजनिक पदांवर असलेल्या व्यक्तींची शैक्षणिक पात्रता जाणून घेण्याचा नागरिकांना अधिकार आहे, असे दिपकेने ठामपणे सांगितले. झारखंडमधील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याचा दावा करत, त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत त्यांनी आंदोलन मागे घेऊ नये. तसेच ‘कॉकरोच जनता पार्टी’ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून आवश्यक ती मदत करेल, अशी ग्वाहीही दिपकेने दिली.
दिपकेने असेही नमूद केले की, ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत CJP चा देशभरातील विस्तार, संघटनात्मक रचना आणि भविष्यातील राजकीय रणनीती यांचा आराखडा निश्चित केला जाईल. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, राजकीय पक्षांवर सध्या ईडी आणि सीबीआयसारख्या संस्थांचा दबाव आहे आणि पक्षांमध्ये फूट पाडण्यासाठी या यंत्रणांचा वापर केला जात असल्याचे दिसून येते.
एका पक्षासाठी मते दिली जातात, तरीही पूर्णपणे वेगळ्या पक्षाचे सरकार सत्तेवर येते. परिणामी, पारंपारिक राजकारणाबद्दल जनतेमध्ये असंतोष वाढत आहे. अशा परिस्थितीत, केवळ नवीन पक्ष स्थापन करून समस्या सुटणार नाहीत. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी गरज पडल्यास जंतरमंतरवर आंदोलन करण्यासही आपण तयार आहोत, असे दिपकेने सांगितले.
गुजरातच्या एका आरटीआय (RTI) कार्यकर्त्यांने प्रश्न उपस्थित केला होता की, अभिजित दिपकेच्या वडिलांचे वेतन ६० हजार रुपये असताना त्यांनी अमेरिकेत शिक्षण कसे घेतले आणि त्याचा खर्च कोणी केला. यासंदर्भात माहिती मागवण्यात आली होती. याबद्दल विचारले असता अभिजित दिपकेने अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली. “जर तुम्ही माझ्या वडिलांच्या पगाराबद्दल विचारत असाल, तर मोदींची पदवीही दाखवा,” असे उघड आव्हान दिपकेने दिल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘एका माणसात इतके गुण नसतात’; देवेंद्र फडणवीसांवर चंद्रकांत पाटील यांची स्तुतीसुमने
- ‘मोदी-शहांनी संघात आपले चमचे बसवले का?’ भागवतांनी बोलावे – संजय राऊत
- भाजपमधून बाहेर पडा, मुख्यमंत्री व्हा! पंकजा मुंडेंना मोठी ऑफर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












