मुंबई : सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘जनरेशन झेड’ (Gen Z) तरुणांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत असे म्हटले होते. त्यामुळे, जंतरमंतर येथील आंदोलन घटनात्मक आहे की नाही, यावर त्यांनी भाष्य केले पाहिजे. या संपूर्ण प्रकरणावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली आहे. “जर संघातून मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या मतापेक्षा वेगळा दुसरा आवाज निघत असेल, तर याचा अर्थ मोदी-शहा (Modi-Shah) यांनी संघामध्ये आपली चमचे पेरले आहेत, असा घणाघाती प्रहार खासदार संजय राऊत यांनी केला.
जर हे आंदोलन घटनाबाह्य मानले जात असेल, तर जयप्रकाश नारायण यांची १९७५ ची चळवळ आणि भाजपची यापूर्वीची आंदोलने कोणत्या घटनात्मक चौकटीत बसत होती, याचे स्पष्टीकरण संघ आणि भाजपने दिले पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा भारतीय संविधान किंवा तिरंग्याला मानत नाही. त्यांनी ५२ वर्षे आपल्या मुख्यालयात तिरंगा फडकवला नाही आणि त्यांना स्वतःची वेगळी राज्यघटना तयार करायची आहे. ८५० खासदारांचे बळ एकवटून भाजपला भारतीय संविधान मोडीत काढायचे आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. २० विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या भ्रष्ट शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी जंतरमंतरवर तरुणांनी केलेले आंदोलन कोणत्याही परिस्थितीत घटनाबाह्य मानले जाऊ शकत नाही, असे संजय राऊत यांनी ठामपणे सांगितले.
Sanjay Raut attacks RSS and Modi-Shah
राम मंदिरातील चोरी आणि पप्पू यादव यांच्यावरील हल्ल्याबाबत राऊत यांनी भाष्य केले. “मंदिरात ४०० कोटी रुपयांची चोरी आणि ५५० कोटी रुपयांच्या देणगी पेटीशी संबंधित चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्याविरुद्ध आवाज उठवणे हे घटनाबाह्य असू शकत नाही. देणगी चोरीबाबत आवाज उठवणाऱ्या खासदार पप्पू यादव यांच्यावर झालेला चाकूचा हल्ला दुर्दैवी आहे. संघाचे सदस्य या हल्ल्याचे समर्थन करत आहेत, ही बाब संघटनेच्या मोठ्या नैतिक अध:पतनाचे लक्षण आहे. राम मंदिरातील चोरी संघ आणि भाजपच्या संमतीने झाली होती का? तसेच, चोरी करणाऱ्यांना सरकार पाठीशी घालत आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
सोलापुरात दाखल झालेल्या गुन्ह्यांबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले, “आम्ही आमचे संपूर्ण आयुष्य गुन्हेगारीविरुद्ध लढण्यात घालवले आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. आमच्यावर गुन्हे दाखल करणाऱ्यांना आम्ही घाबरत नाही.शिवसेनाप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिल्यामुळे जर गुन्हे दाखल केले जात असतील, तर ती हुकूमशाहीच आहे.”
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे परदेशी निधी असल्याचा आरोप संजय राऊत यांनी फेटाळून लावला आणि सांगितले की, “भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) परदेशातील शाखा स्वतःच तिथून मोठ्या प्रमाणावर निधी (देणग्या) गोळा करतात. हे तरुण पंतप्रधानांकडे दयायाचना करण्यासाठी गेले नव्हते. पंतप्रधानांची ही निव्वळ नौटंकी आहे. देशाला आणखी काही महिने ही नौटंकी झेलावी लागेल.” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
📌 महत्वाच्या बातम्या
- भाजपमधून बाहेर पडा, मुख्यमंत्री व्हा! पंकजा मुंडेंना मोठी ऑफर
- कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही? 94 हजार शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट
- ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026’ लागू; जाणून घ्या महत्त्वाच्या तरतुदी…













