Share

कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही? 94 हजार शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’अंतर्गत 94 हजार इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी अपात्र ठरले आहेत.

Published On: 

Shetkari Karjamukti Yojana: 94,000 farmers ineligible.

मुंबई : राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून, अनेक जिल्ह्यांमध्ये या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची यादी आधीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, काही भागांत शेतकऱ्यांच्या नावांसमोर नमूद केलेली कर्जमाफीची रक्कम अपेक्षेपेक्षा कमी असल्याने गोंधळ निर्माण झाला होता. आता या योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सुमारे ९४,००० शेतकऱ्यांना लाभार्थींच्या यादीतून वगळण्यात आले आहे.

राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ (Punyashlok Ahilyadevi Holkar Shetkari Karjamukti Yojana) बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. छाननी प्रक्रियेदरम्यान, तब्बल ९४,००० शेतकरी हे ‘इन्कम टॅक्स’ (income tax) भरत असल्याचे आढळून आल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले.

Shetkari Karjamukti Yojana: 94,000 farmers ineligible.

दरम्यान, उर्वरित १६.९४ लाख पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यांमध्ये येत्या मंगळवारी एकाच वेळी एकूण ७,००० कोटी रुपये जमा केले जाणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या निर्णयामुळे संबंधित शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

राज्य सरकारने ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी, तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांसाठी ५०,००० रुपयांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते. ज्या शेतकऱ्यांचे थकीत कर्ज २ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी ‘एकवेळ परतफेड योजना’ (OTS) सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात, २ लाख रुपयांपेक्षा कमी कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची यादी पडताळणीसाठी इन्कम टॅक्स विभागाकडे पाठवण्यात आली होती. या प्रक्रियेत इन्कम टॅक्स भरणारे ९४,००० शेतकरी यादीतून वगळले गेले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही