Share

Maratha Reservation : ‘शरद पवारांनी तेव्हाच निर्णय घ्यायला हवा होता’- भरत गोगावले

भरत गोगावले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांवर निशाणा साधत, पूर्वीच निर्णय घ्यायला हवा होता, असं म्हटलं आहे.

Published On: 

Bharat Gogawale-Sharad Pawar

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला आहे. शरद पवारांनी पूर्वीच मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यायला हवा होता, असं गोगावले यांनी म्हटलं. त्याचबरोबर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत तज्ज्ञांकडून कायदेशीर चौकटीत तपास सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

शरद पवार यांनी केलेल्या विधानावर भरत गोगावले यांनी भाष्य केले. “शरद पवारांनी निर्णय घेतला असता तर समाजाला फायदा झाला असता. पवारांनी पूर्वीच्या काळात मराठा आरक्षणावर निर्णय घ्यायला हवे होते. जुन्या काळात अटी शर्ती फारशा नव्हत्या. त्यावेळी निर्णय घेतला असता. तर यांचा फायदा समाजाला झाला असता. असे विखे पाटील यांना वाटले असेल. तर पवारांनी करायला हवे होते, असे मंत्री भरत गोगावले म्हणाले.

Bharat Gogawale-Sharad Pawar

मंत्री भरत गोगावले पंढरपुरात असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. गोगवले यांनी असेही सांगितले की, जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाच्या संदर्भात हैदराबाद आणि सातारा गॅझेट्स कायदेशीर चौकटीत राहून तज्ज्ञांकडून तपासली जात आहेत. रोजगार हमी योजनेअंतर्गत अनेक कंत्राटदारांची देयके प्रलंबित आहेत. यासंदर्भात, महाराष्ट्राला शिवराज सिंह चौहान यांच्याकडून ३,००० कोटी रुपये मिळणार आहेत.”

ही रक्कम केंद्राकडे आहे. 3 हजार कोटीची रक्कम आल्यावर अनेक योजनेतील बिल दिली जाणार आहे. रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून प्रथमच पंढरपूरला आलो आहे. अनेक कार्यकर्त्यांनी आपण पालकमंत्री व्हावे. म्हणून विठ्ठलाला नवस केले होते. त्यासाठीच आज आपण दर्शनासाठी आलो असल्याचे यावेळी गोगावले यांनी सांगितले.

पण , पालकमंत्री पदाला एकनाथ शिंदे यांनी स्थगिती आणली. म्हणूनच पालकमंत्री पद मिळाले. त्यामुळे कुणी काहीही बोलो. त्यांचे तोंड बंद करू शकत नाही. त्यामुळे जो दिला उसका भला… न दिया उसकाभी भला…असे म्हणत गोगावले यांनी ही प्रतिक्रिया दिली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही