Share

समीर चौघुले अन् सचिनची पहिली भेट; ‘क्रिकेटच्या देवाला’ पाहून अभिनेत्याला अश्रू अनावर, नेमकं काय घडलं?

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौघुलेंनी सचिन तेंडुलकरसोबतच्या पहिल्या भेटीचा भावनिक किस्सा शेअर केलाय. सचिनला समोर पाहून अभिनेत्याला अश्रू अनावर झाले होते.

Published On: 

Samir Choughule emotional meeting with Sachin Tendulkar

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारे अभिनेते समीर चौघुले (Samir Choughule) खऱ्या आयुष्यात कोणाचे फॅन असतील? हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? याचं उत्तर खुद्द समीर यांनीच नुकत्याच एका मुलाखतीत दिलंय. त्यांनी त्यांच्या लाडक्या ‘देवाला’ म्हणजेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा त्यांना चक्क अश्रू अनावर झाले होते.

‘इसापनीती टॉक्स’ या पॉडकास्टला दिलेल्या एका दिलखुलास मुलाखतीत त्यांनी हा भन्नाट किस्सा शेअर केलाय. सचिन तेंडुलकर हा त्यांच्यासाठी केवळ एक क्रिकेटर नसून खऱ्या अर्थाने देवच आहे. विशेष म्हणजे, सचिनने क्रिकेटच्या मैदानावर भारताला जिंकून द्यावं, यासाठी समीर यांनी अनेकदा कडकडीत उपवास देखील केले आहेत.

Samir Choughule on Sachin Tendulkar

सेन्चुरियन पार्कवर सुरू असलेल्या वर्ल्ड कपच्या एका महत्त्वाच्या सामन्याची आठवण सांगताना ते म्हणाले की, सचिनने तो सामना जिंकावा म्हणून त्यांनी दिवसभर पाण्याचा एक थेंबही प्यायला नव्हता. गंमत म्हणजे, ज्या ज्या वेळी त्यांनी उपवास केले, त्या वेळी सचिनने भारताला नक्कीच विजय मिळवून दिलाय. त्यामुळे आपलाच उपवास फळल्याची गोड भावना त्यांच्या मनात आजही कायम आहे.

या दोघांची पहिली भेट एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान झाली. समीर त्यावेळी भरत दाभोळकरांचं ‘तमाशा मुंबई स्टाईल’ हे नाटक करत होते. विनय एडेकर या सहकलाकाराने त्यांची सचिनशी भेट घडवून आणली होती. सुरुवातीला सचिनची फक्त बीएमडब्ल्यू गाडी पाहूनच समीर यांनी त्या गाडीला अक्षरशः नमस्कार केला होता.

प्रत्यक्ष भेटीचा क्षण तर त्यांच्यासाठी खूपच थरारक होता. सचिनने मध्यांतरापर्यंत नाटक पाहिलं आणि त्यानंतर तो आवर्जून समीर यांना भेटायला गेला. “तुम्ही खूप छान काम करता, मी तुमचा फॅन झालोय”, अशी कौतुकाची थाप जेव्हा सचिनने दिली, तेव्हा समीर चक्क ढसाढसा रडायला लागले. त्यांच्या घरातील देव्हाऱ्यात आजही सचिनचा फोटो असल्याचं त्यांनी अभिमानाने सांगितलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही