मुंबई : भुसावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा राजकीय फटका बसला आहे. नगरपरिषदेचे २ माजी नगराध्यक्षांसह ११ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे भुसावळच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, स्थानिक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी आणि गायत्री भांगळे यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. भुसावळच्या राजकारणात या दोन्ही नेत्यांचा मोठा प्रभाव असल्याने, त्यांच्या या निर्णयाकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.
Eknath Shinde Bhusawal leaders
गायत्री भांगळे यांनी पक्ष बदलण्याचा घेतलेला निर्णय हा भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाशी संबंधित राजकीय घडामोडींशी जोडलेला असावा, अशी चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, या चर्चेला अद्याप कोणतीही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
गायत्री भांगळे या यापूर्वी भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्या होत्या. मात्र, एका समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते.
गायत्री भांगळे आणि अनिल चौधरी यांच्यासोबतच, भुसावळ नगरपरिषदेतील शरद पवार गटाच्या ११ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. यामध्ये गट नेते सचिन संतोष चौधरी, इक्बाल दिलनवाज शेख, उल्हास भीमराव पगारे, सुभद्रा गुंजाळ, अमीन कुरेशी, शेख नसीब शेख नदीम, सचिन भास्कर पाटील, अकील नादर पिंजारी, शबाना बी सिकंदर खान, पुष्पा कैलास चौधरी आणि सुनीता कृषधनकर यांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त, सिकंदर खान, नदीम सरकार, इसाक बागवान, ओमप्रकाश झा, गिरीश पारधी, महेंद्र चौधरी, नरसिंह तायडे, अनिकेत झा, नचिकेत मंदवाळे, आरिफ खान आणि आरिफ शेख यांसारख्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनीही शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.
एकनाथ शिंदे यांच्याकडून स्वागत
पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे भुसावळमध्ये शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची ताकद वाढली असून, याचा परिणाम नजीकच्या काळात स्थानिक राजकारणावर होण्याची शक्यता आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘फडणवीस दिल्लीत जाणार, सर्वोच्चपदी विराजमान होणार’; संजय राऊतांचा गौप्यस्फोट
- ISRO EOS-05 Launch: भारताची सीमेवर 24 तास पाळत; चीन-पाकिस्तानवर बारीक नजर
- रोहित शर्मा खरंच निवृत्ती घेणार होता? निवड समितीच्या ‘त्या’ मेसेजवर संतापलेला ‘हिटमॅन’, मोठी माहिती समोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











