Share

दिल्लीतील सीजेपी आंदोलनावरील कारवाईवरून राज ठाकरेंचा संताप; मोदी-शहांना दिला थेट इशारा

सीजेपीच्या दिल्लीतील आंदोलनावर पोलिसांकडून कारवाई सुरू असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावरून मोदी-शहा यांच्यावर हुकूमशाहीचा गंभीर आरोप केला आहे.

Published On: 

Raj Thackeray Speech: 'तुला त्याच खड्ड्यात उभा करून मारेन'; राज यांचा इशारा

प्रतिनिधी, 10 ऑक्टोबर: दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर थेट हुकूमशाहीचा आरोप करत, आंदोलकांना चिरडण्याचा प्रयत्न केल्यास ही बेबंदशाही उखडून काढली जाईल, असा सज्जड इशारा ठाकरेंनी एका विस्तृत पोस्टद्वारे दिला आहे.

जंतरमंतरवर सीजेपीचे कार्यकर्ते आंदोलन करत असून, परवानगी नसल्याचे कारण देत दिल्ली पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. या कारवाईला माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनाही सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नोव्हेंबर १९४९ मधील “No nation can be grateful at the cost of its liberty” या विधानाचा दाखला देत, नेत्याच्या आंधळ्या भक्तीसाठी देशाचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती पणाला लावता कामा नये, असे त्यांनी सुनावले. मोदी आणि शहा यांच्या डोक्यात पराकोटीची हुकूमशाही भिनली असून, त्यांनी सर्व यंत्रणा काबीज करून केवळ मूठभर उद्योगपतींसाठी सत्ता राबवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

‘भ्रष्ट’ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ३ ऑक्टोबरपासून दिल्लीत हे आंदोलन सुरू आहे. मात्र, सरकार या आंदोलकांना आणि ते कव्हर करणाऱ्या महिला पत्रकारांचा छळ करत असल्याचे ठाकरे म्हणाले. आंदोलनाच्या भीतीने मेट्रो, इंटरनेट, बस सेवा बंद करणे, रस्ते अडवणे आणि आंदोलकांना विमानातून उचलून नेणे यावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. देशातील २०-३० वर्षांचे तरुण-तरुणी भविष्याच्या चिंतेने शांततेत रस्त्यावर उतरत असताना त्यांना चिरडले जात आहे. जगभरात लोकशाहीचा टेंभा मिरवणारे मोदी आता कोणत्या तोंडाने देशात लोकशाही असल्याचे सांगणार, असा सवाल करत, ज्ञानेश कुमार यांच्याविषयी सत्ताधाऱ्यांना इतके प्रेम का, अशी विचारणा ठाकरेंनी केली. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिल्यास मतचोरीचे खरे सूत्रधार कोण, याचे बिंग फुटेल अशी भीती ‘वरच्या दोघांना’ वाटत आहे का, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.

संविधानातील कलम १९ (१) (अ) आणि (ब) नुसार नागरिकांना शांततेत निदर्शने करण्याचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयानेही ‘माशी मारायला हातोडा कशाला वापरताय?’ अशी विचारणा केल्याचे ठाकरेंनी निदर्शनास आणून दिले. महाराष्ट्रात पोलीस आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडून देतात आणि त्यांच्या संविधानिक अधिकारांना धक्का लागणार नाही याची काळजी घेतात; मात्र दिल्लीत महिला पत्रकारांचाही छळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तरुणांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला लावल्याचा राग अद्याप शमला नसल्याचे दिसत असल्याचे ते म्हणाले. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला सोयीसाठी पाठिंबा देणाऱ्या मोदी-शहांनी सत्तेत आल्यावर गुजरातमधील आंदोलने चिरडली, यावरून त्यांचा दुटप्पी आणि बेगडीपणा उघड होत असल्याची टीका ठाकरेंनी केली.

अमित शहा नेटफ्लिक्सवरील ‘How to Become a Tyrant’ ही डॉक्युमेंट्री रोज गांभीर्याने बघत असावेत, असा टोला लगावतानाच, त्यापेक्षा महात्मा गांधींच्या शांततापूर्ण आंदोलनांचा इतिहास वाचण्याचा सल्ला त्यांनी दिला. सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा अमरपट्टा घेऊन आल्याच्या भ्रमात राहू नये; ज्या जनतेने मुघल, पोर्तुगीज आणि ब्रिटिशांचा माज उतरवला, ती स्वकीयांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत राज ठाकरेंनी सरकारकडून प्रगल्भतेची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच, आंदोलन करण्याचा प्रत्येकाचा अधिकार अबाधितच राहिला पाहिजे, यावर त्यांनी (Raj Thackeray) ठामपणे भर दिला.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही