Share

मेट्रो आणि रेल्वे बंदीवरून अभिजीत दीपकेंचा संताप; म्हणाले, ‘मोदीजी, बीपी चेक करत राहा’

दिल्लीत आंदोलन रोखण्यासाठी सरकारने मेट्रो आणि रेल्वे बंद केल्याने अभिजीत दीपके यांनी व्हिडिओद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

Published On: 

Abhijeet Dipke criticizing PM Narendra Modi over Delhi metro and train shutdown

प्रतिनिधी, 9 ऑक्टोबर: दिल्लीत होणारे आगामी आंदोलन रोखण्यासाठी केंद्र सरकारने रेल्वे गाड्या आणि मेट्रो स्टेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी एका व्हिडिओद्वारे केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

या वाहतूक बंदीवरून सरकारवर निशाणा साधताना त्यांनी उपहासात्मक सल्ला दिला आहे. “मोदीजी, आपली तब्येत ठीक आहे ना? बीपी (रक्तदाब) चेक करत राहा,” असा टोला त्यांनी लगावला. दिल्लीतील ५७ मेट्रो स्टेशन बंद करून भारत सरकारने एकप्रकारे दिल्ली बंदीचीच घोषणा केली असल्याचा दावा त्यांनी (Abhijeet Dipke) या व्हिडिओत केला आहे.

अभिजीत दीपके यांनी या निर्णयाची तुलना इंदिरा गांधींच्या काळातील आणीबाणीशी केली आहे. “आणीबाणीच्या काळातही इंदिरा गांधींनी (द डिक्टेटर) रेल्वे बंद केल्या नव्हत्या,” असे ते म्हणाले. याशिवाय, व्हिडिओमध्ये सचिन शर्मा यांचा संदर्भ देत त्यांची तुलना थेट ‘जनरल डायर’शी करून संताप व्यक्त करण्यात आला आहे.

आंदोलनकर्त्यांना रोखण्याच्या उद्देशाने सरकारने ही वाहतूक बंदी लागू केली असली तरी, कोणत्याही परिस्थितीत दिल्लीत आपले आंदोलन पुढे नेण्याचा निर्धार या लोकांनी व्यक्त केला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

दिल्लीत होणारे आगामी आंदोलन रोखण्यासाठी केंद्र सरकारने रेल्वे गाड्या आणि मेट्रो स्टेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही