प्रतिनिधी, 9 ऑक्टोबर: राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पाच कोटी रुपयांहून अधिक खर्च करून लंडनचा दौरा केल्याचा मुद्दा समोर आला आहे. यावरून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी एका ट्विटद्वारे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. करदात्यांच्या पैशातून अधिकाऱ्यांनी मौजमजेसाठी ही सहल काढल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
उद्योग मंत्रालयाचे अधिकारी एका परिषदेला उपस्थित राहण्यासाठी लंडनला गेले आहेत. मात्र, या शिष्टमंडळासोबत जाण्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ऐनवेळी टाळले. यावर बोट ठेवत, मंत्र्यांनीच माघार घेतल्यानंतर उर्वरित शिष्टमंडळाला लंडनला जाण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र सध्या दुष्काळसदृश संकटाचा सामना करत असून, या परिस्थितीचा राज्यातील उद्योगांवर मोठा परिणाम होईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ‘सुपर अल निनो’च्या या काळात अधिकाऱ्यांनी लंडनवारीचा आनंद लुटण्याऐवजी वीज आणि पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी विविध जिल्ह्यांचे दौरे करायला हवे होते, असा युक्तिवादही त्यांनी केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर दाखल करा; रोहित पवारांचे पुणे पोलिसांना थेट आव्हान
- ‘आपण एकत्र यायचं का?’ सुप्रिया सुळेंच्या घरी पार्थ पवारांना विचारल्याचा युगेंद्र पवारांचा गौप्यस्फोट
- केसांमधील कोंड्यापासून मुक्ती हवीय? त्वचाविकारतज्ज्ञांनी दिला योग्य शॅम्पू आणि स्वच्छतेचा सल्ला
Quick Answers
करदात्यांच्या पैशातून अधिकाऱ्यांनी मौजमजेसाठी पाच कोटी रुपयांहून अधिक खर्च करून लंडनची सहल काढल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या शिष्टमंडळासोबत जाण्याचे ऐनवेळी टाळले. त्यावर बोट ठेवत, मंत्र्यांनीच माघार घेतल्यानंतर उर्वरित शिष्टमंडळाला लंडनला जाण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती, असे मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केले.
‘सुपर अल निनो’च्या या दुष्काळसदृश काळात अधिकाऱ्यांनी लंडनवारीचा आनंद लुटण्याऐवजी वीज आणि पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी विविध जिल्ह्यांचे दौरे करायला हवे होते, असा युक्तिवाद त्यांनी केला.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









