Share

‘आपण एकत्र यायचं का?’ सुप्रिया सुळेंच्या घरी पार्थ पवारांना विचारल्याचा युगेंद्र पवारांचा गौप्यस्फोट

सुप्रिया सुळे यांच्या घरी झालेल्या भेटीत आपण पार्थ पवार यांना दोन्ही गट एकत्र येण्याबाबत विचारल्याचे युगेंद्र पवार यांनी उघड केले आहे.

Published On: 

Yugendra Pawar reveals discussion with Parth Pawar over NCP reunion

प्रतिनिधी, 9 ऑक्टोबर: शरद पवार आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, याबाबत सातत्याने चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. सुप्रिया सुळे यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीदरम्यान आपण पार्थ पवार यांना दोन्ही गटांनी एकत्र यायचे का, याबाबत विचारणा केल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले आहे.

सुप्रिया सुळे यांच्या घरी झालेल्या या भेटीत सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीवर किंवा पार्थ पवार यांच्याशी निवडणुकीबाबत चर्चा झाली का, असे युगेंद्र पवार यांना विचारण्यात आले होते. त्यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, रेवती लग्नानंतर बऱ्याच दिवसांनी आल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी सर्वांना घरी बोलावले होते. याच कौटुंबिक भेटीदरम्यान, आपण दोन्ही गट एकत्र आल्यास काय नुकसान आहे, असा प्रश्न सहजपणे पार्थ पवार यांना विचारल्याचे युगेंद्र यांनी सांगितले.

युगेंद्र पवार यांच्या या प्रश्नावर पार्थ पवार यांनीही उत्तर दिले. कार्यकर्त्यांचा विरोध असल्याने आता दोन्ही गट एकत्र येणे अशक्य असल्याचा दावा पार्थ पवार यांनी केल्याचे युगेंद्र यांनी सांगितले. दरम्यान, दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाच्या चर्चेवर शरद पवार यांनी सप्टेंबर महिन्यातच आपली भूमिका स्पष्ट केली होती. आपला पक्ष कोणाशीही आघाडी करणार नाही आणि दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले होते.

सहकार क्षेत्रातील घडामोडींवर बोलताना युगेंद्र पवार यांनी सांगितले की, शरद पवार गटाने कारखान्यात पॅनेल उभे केले असून, कारखाना आणि सभासदांच्या हिताचे रक्षण करणे हा त्यामागचा उद्देश आहे. शरद पवार यांच्याकडे सहकार क्षेत्रातील दांडगा अनुभव असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, माळेगाव कारखाना सध्या फायद्यात चालत नसल्याचे आपले मत युगेंद्र पवार यांनी व्यक्त केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

सुप्रिया सुळे यांच्या निवासस्थानी झालेल्या कौटुंबिक भेटीदरम्यान, युगेंद्र पवार यांनी दोन्ही गटांनी एकत्र यायचे का आणि दोन्ही गट एकत्र आल्यास काय नुकसान आहे, असा प्रश्न सहजपणे पार्थ पवार यांना विचारला होता.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही