फिटनेसच्या नादात आपण अनेकदा धडपडतो, पण तोच पडतानाचा व्हिडिओ जगाला दाखवण्याची हिंमत किती जणांमध्ये असते? आपल्या भन्नाट विनोदी शैलीने हसवणाऱ्या वनिता खरातसोबत (Vanita Kharat) जिममध्ये नेमकं काय घडलंय?
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता सध्या तिच्या फिटनेस जर्नीवर फोकस करत आहे. वजन कमी करण्यासाठी ती नियमित अवघड व्यायाम करत असते, मात्र नुकताच तिचा एक भन्नाट किस्सा समोर आला आहे.
Vanita Kharat Workout
वनिताने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. यात ती एक अत्यंत अवघड व्यायाम प्रकार करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, हा सराव करत असतानाच अचानक तिचा तोल जातो आणि ती थेट खाली पडते.
विशेष म्हणजे, हा व्हिडिओ लपवण्याऐवजी तिने तो अत्यंत सकारात्मक आणि विनोदी पद्धतीने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. व्हिडिओला तिने दिलेलं कॅप्शन सध्या जोरदार व्हायरल होतंय. तिने लिहिलंय, “यापेक्षा प्रेमात पडणं जास्त सोपं आहे.”
तिच्या या मिश्किल अंदाजाचे चाहते भरभरून कौतुक करत आहेत. फिटनेससाठी घेतलेली तिची मेहनत आणि स्वतःवरच हसण्याची तिची वृत्ती अनेकांना प्रेरणा देत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘…तर मोदींची डिग्री दाखवा’; अभिजित दीपकेचे सरकारला खुले आव्हान
- ‘एका माणसात इतके गुण नसतात’; देवेंद्र फडणवीसांवर चंद्रकांत पाटील यांची स्तुतीसुमने
- ‘मोदी-शहांनी संघात आपले चमचे बसवले का?’ भागवतांनी बोलावे – संजय राऊत













